आश्चर्यजनक ! अमेरिकेत आढळला ‘यति’ सदृश्य माणूस; पाठलाग करताच अचानक झाला ‘गायब ‘

वॉशिंग्टन – उत्तर अमेरिकेतील एका बर्फाळ क्षेत्रांमध्ये यती सदृश महाकाय प्राणी आढळल्याचा दावा माजी लष्करी अधिकारी ट्रे हडसन यांनी केला आहे. हडसन हे ऑक्सफर्ड पॅरानॉर्मल सोसायटीचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांच्या या दाव्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
अमेरिकेतील डेली स्टार या वृत्तपत्राशी बोलताना ट्रे हडसन यांनी वरील खुलासा केला आहे. हडसन यांच्या नेतृत्वाखालील टीम या क्षेत्रामध्ये संशोधन करत असताना कडाक्याच्या थंडीत त्यांना रात्री हा प्राणी दिसला. हडसन आणि त्यांच्या टीमने या प्राण्याचा पाठलाग करायचा प्रयत्न केला पण तो प्राणी अचानक गायब झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. हडसन यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे हा प्राणी केवळ रक्त आणि मांस यापासून बनलेला नसून त्याच्याकडे काहीतरी विशेष शक्ती पण असावी त्यामुळेच तो बघता बघता गायब होऊ शकला.
या घटनेविषयी अधिक माहिती देताना हडसन म्हणाले, रात्री दोन ते तीनच्या दरम्यान झाडाखाली त्यांना माणसासारखाच आकार असणारा एक विशाल काय प्राणी दिसला हा प्राणी हडसन यांच्या कॅम्पकडे एकटक नजरेने बघत होता. हडसन यांच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी टीम मधील इतर सहकार्यांना त्याची कल्पना दिली. या महिला सहकार्याकडे थर्मल इमेजिंग नाईट व्हिजन आणि इन्फ्रारेड उपकरणे उपलब्ध होती.
हे उपकरणे घेऊन तो सहकारी त्या झाडापाशी गेला. तोपर्यंत तो प्राणी गायब झाला होता. अस हैराण करणारी गोष्ट म्हणजे तो प्राणी बराच काळ त्या झाडाखाली उभा असतानाही झाडाखाली पडलेल्या बर्फामध्ये त्याच्या पायाचे ठसे आढळले नाहीत.
आसपासही त्या प्राण्याचे कोणते संकेत आढळले नाही. हडसन यांच्या नेतृत्वाखालील टीमने नंतर दीर्घ काळ या प्राण्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा कोठेही मागमूस लागला नाही. त्या झाडाखाली आपण अशाप्रकारचा महाकाय प्राणी पाहिल्याचा त्यांचा दावा मात्र कायम आहे.





