‘वन बिग ब्यूटीफुल बिल’ मंजूर झाल्यानंतर ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,”आम्ही कर कपात कायमस्वरूपी”

Trump on ‘One Big Beautiful Bill’। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रसिद्ध ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ गुरुवारी रात्री उशिरा प्रतिनिधी सभागृहात २१८-२१४ मतांनी मंजूर झाले, जे त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहातून मंजूर झाल्यानंतर, हे विधेयक आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याच वेळी, विधेयकावरील मतदानादरम्यान, दोन रिपब्लिकन खासदारांनी पक्षाची बाजू तोडून डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने मतदान केले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही सभागृहातून हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच,”मी लाखो कुटुंबांना ‘डेथ टॅक्स’मधून मुक्त केले आहे” असे म्हटले. तसेच अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या विधेयकापेक्षा चांगली भेट असू शकत नाही.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विधेयक मंजूर झाल्यानंतर, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी पत्रकारांना सांगितले की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या मोठ्या कर सवलती आणि खर्च कपात विधेयकावर स्वाक्षरी करण्याची योजना आखत आहेत. ४ जुलै रोजी स्वाक्षरी समारंभ अशा वेळी होईल जेव्हा या सुट्टीच्या निमित्ताने व्हाईट हाऊसमध्ये पिकनिक आयोजित केली जाईल.
८०० पेक्षा जास्त पानांचे हे विधेयक मंजूर करण्यासाठी ट्रम्प यांना खूप मेहनत घ्यावी लागली. या विधेयकासाठी रिपब्लिकन नेत्यांना रात्रभर काम करावे लागले आणि ट्रम्प यांनी वैयक्तिकरित्या होल्डआउट्सवर दबाव आणला जेणेकरून पुरेशी मते मिळतील. या विधेयकात कर कपात, लष्करी बजेट, संरक्षण आणि ऊर्जा उत्पादनासाठी वाढलेला खर्च तसेच आरोग्य आणि पोषण कार्यक्रमांमध्ये कपात यासारख्या प्रमुख तरतुदींचा समावेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? Trump on ‘One Big Beautiful Bill’।
डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही सभागृहातून हे विधेयक मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना, “मी वचन दिल्याप्रमाणे, आम्ही ट्रम्प कर कपात कायमस्वरूपी करत आहोत. आता टिप्स, ओव्हरटाइम आणि सामाजिक सुरक्षेवर कोणताही कर लागणार नाही… आयोवासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विधेयक २० लाखांहून अधिक कुटुंब शेतींना तथाकथित इस्टेट टॅक्स किंवा डेथ टॅक्सपासून मुक्तता देते.” असे त्यांनी म्हटले.
तसेच पुढे बोलताना ट्रम्प यांनी, “अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ पेक्षा चांगली भेट असू शकत नाही. या विधेयकामुळे २०२४ मध्ये आयोवाच्या लोकांना दिलेले प्रत्येक मोठे वचन पूर्ण झाले आहे.” असेही म्हटले आहे.
जेडी व्हान्स यांनी आनंद व्यक्त केला Trump on ‘One Big Beautiful Bill’।
उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी विधेयक मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत ‘सर्वांचे अभिनंदन. कधीकधी मला शंका होती की आम्ही ते ४ जुलैपर्यंत पूर्ण करू शकू!’असे म्हटले आहे. तसेच त्यांनी पुढे लिहिले, ‘पण आता आम्ही सीमा सुरक्षित करण्यासाठी मोठ्या कर कपात आणि आवश्यक संसाधने दिली आहेत.’असेही म्हटले आहे.
‘विधेयक मंजूर होणे निराशाजनक
युनायटेड फूड अँड कमर्शियल वर्कर्स इंटरनॅशनल युनियनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मिल्टन जोन्स म्हणाले की, “काँग्रेसने हे हानिकारक, कुरूप विधेयक मंजूर केले आहे जे कामगार कुटुंबांच्या गरजांकडे दुर्लक्ष करते आणि केवळ क्रूरच नाही तर आर्थिकदृष्ट्या बेपर्वा कपात करते हे निराशाजनक आहे.”





