होय आजही “श्रावणबाळ’ आहे!

Updated On:

आबा बागुलांच्या या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनेकांनी काशी यात्रेचे उपक्रम सुरू केले. मात्र या अनुकरणीय उपक्रमाची सुरुवात आबा बागुल यांनी केली, ही नोंद कायम राहील. आजपर्यंत पन्नास हजारांहून अधिक गरीब वृद्ध माता-पित्यांना काशी यात्रा घडविणाऱ्या आबा बागुल यांचा हा उपक्रम याही पुढे सुरू राहण्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला आहे. “श्रावणबाळ’ या पुरस्काराने त्यांना सन्मानितही केले गेले आहे आणि त्यामुळेच अखेरीस म्हणावे लागते की “होय, श्रावणबाळ अजूनही आहे!’

आबा बागुल हे पुणे शहरात पुणे महानगरपालिकेचे कॉंग्रेस पक्षाचे गेली तीस वर्षे सलगपणे नगरसेवक आहेत. ते पुणे महानगरपालिका स्थायी समिती सदस्य होते, स्थायी समिती अध्यक्ष होते, पुणे मनपा कॉंग्रेस पक्ष गटनेते होते, उपमहापौर होते आणि आता पुन्हा कॉंग्रेस पक्ष गटनेते आहेत. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक वृद्ध माता-पित्यांना विनामूल्य काशीयात्रा घडवली आहे हे वाचून आश्चर्य वाटले ना!

आयुष्यात आपण ज्रेमतेम एकदा आपल्या वृद्ध माता-पित्यांना घेऊन काशीयात्रेस गेलो आहोत. आबा बागुल यांनी मात्र सन 2004 पासून आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक वृद्ध मातापित्यांना विनामूल्य काशीयात्रेला नेले आणि त्यांचा हा उपक्रम अजूनही चालूच राहिला आहे याचे निश्‍चितच कौतुक आहे.

उत्सुकतेने या उपक्रमाची माहिती विचारली तेव्हा आबा बागुल म्हणाले, “माझी आई श्रीमती नलिनी वसंतराव बागुल यांच्या समवेत आम्ही सार्या कुटुंबीयांनी काशी यात्रा केली. श्री भोलेनाथाचे दर्शन घेऊन यथासांग अभिषेक केला.

प्रसाद मस्तकी लावला. श्री काशीविश्‍वेश्‍वराचे दर्शन घेण्याची आईची इच्छा पूर्ण झाली होती त्यामुळे तिचे डोळे पाणावलेदेखील होते. पुण्याला परतताना गप्पांमध्ये आई मला म्हणाली, “अशा हजारो आई असतील की ज्यांना आर्थिक विवंचनेमुळे काशीला येऊन दर्शन घेणे शक्‍य होत नसेल.

त्यांच्यासाठी काही तरी कर.’ आईचे हे सांगणे हा माझ्यादृष्टीने आदेशच होता आणि त्याक्षणी मी आईला वचन दिले की, “दरवर्षी मी हजारो वृद्ध मातापित्यांना विनामूल्य काशीयात्रा घडवेन.’ आईला दिलेला शब्द सन 2004 पासून आजपर्यंत अखंडितपणे पाळणारे आबा बागुल यांना खरंच आधुनिक जगातील “श्रावणबाळ’ म्हणावे लागेल. किंबहुना स्वत: झीज सोसून हजारो मातापित्यांना विनामूल्य काशीयात्रा घडवून त्यांची सेवा करणारा “श्रावणबाळ’ अजूनही आहे असेच म्हणावे लागेल.

आबा बागुल व त्यांचा कार्यकर्त्यांचा संच त्यांच्या दृष्टीने विनामूल्य काशीयात्रा म्हणजे अगदी नित्याची बाब झाली आहे. प्रथम छापील फॉर्म वाटणे, वृद्ध माता-पित्यांची माहिती, फोटो, वैद्यकीय सर्टिफिकेट व पाल्यांची परवानगी सारे गोळा करून संगणकात त्याची नोंद करणे,

त्यानंतर यात्रेकरूंची निवड झाली की त्यांचे फोटो पास तयर करणे, त्या फोटोपासवर नाव, पत्ता, फोननंबर, घरच्यांचे नंबर, रक्तगट, वैद्यकीय आजार व अन्य अनुषंगिक माहिती तसेच त्या फोटोपासच्या मागे यात्रेसोबत असणार्या प्रमुख संयोजक कार्यकर्त्यांची नावे व फोन नंबर छापून या लोकांचे फोटोपास तयार ठेवणे.

काशीयात्रेकरता तीन महिने आधी रेल्वेचे बुकिंग प्रक्रिया पार पाडली जाते.
यात्रेस प्रारंभ होण्याची दिवशी पुणे स्टेशनवर प्रत्यक्ष रेल्वे निघण्याच्या सुमारास विविध राजकीय पक्षांचे नेते आवर्जून उपस्थित राहुन शुभेच्छा देताता.

पुणे, नगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, … सतना, कटणी, अलाहाबाद असा तब्बल तीस तासांचा प्रवास करीत रेल्वे वाराणसीला दुसर्या दिवशी रात्री पोहोचते तेव्हा यात्रेकरूंना नेण्यासाठी लक्‍झरी बसेस सज्ज असतात. अर्थात जेव्हा काशीयात्रा निघते त्याच्या आधी एक महिना राहुल बागुल, अमितल बागुल व त्यांचे कार्यकर्ते आधी काशी येथे जाऊन धर्मशाळा, भांडीकुंडी, भाजीपाला, धान्य, लक्‍झरी बसेस, होड्या आदी सार्यांचे बुकिंग करून ठेवत असतात. त्यामुळे ऐनवेळी धावपळ काहीच होत नाही.

वाराणसीतील अशोक यादव आणि अर्जुन यादव यांचेदेखील मोलाचे सहकार्य दरवर्षी लाभत असते. जेव्हा काशीयात्रा वाराणसीला पोहोचते तेव्हा सार्या यात्रेकरूंना गादी, पांघरूण, उशी देऊन, गरम जेवण देऊन दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम सांगितला जातो.

दुसर्या दिवशी पहाटेच यात्रेकरू सज्ज होऊन दोनच्या रांगेने पायी चालत गंगाकिनारी येतात आणि त्यांच्या नेत्रांचे पारणे फिटते. गंगानदीकडे बघून “गंगा माता की जय’चा नारा देत सर्वांचेच हात भक्‍तिभावाने आपोआप जोडले जातात आणि आधीच आरक्षित केलेल्या होड्यांमधून पैलतीरी सारे यात्रेकरू जातात. आबा बागुल स्वत: यावर देखरेख करीत असतात.

गंगाकिनारी आंघोळ झाल्यावर तेथे उपस्थित ब्राह्मणांमार्फत पिंडदान ज्यांना करायचे आहे त्यांचे विधी पूर्ण करून हे सारे हजारो यात्रेकरू पुन्हा होड्यांतून दुसर्या काठावर येतात व पुन्हा रांगेने ते काशी विश्‍वेश्‍वराचे दर्शन घेऊन अभिषेक करून सारे यात्रेकरू बाहेर पडतात तेव्हा

अनेक वृद्ध माता-पिता जीवन सार्थकी लागले असे म्हणून ढसाढसा रडताना मी पाहिले आहे. संयोजक आबा बागुलांच्या पुढाकाराने हा अद्वितीय उपक्रम पार पडतो. तेव्हा हजारो वृद्ध माता-पित्यांचे आशीर्वादच आबा बागुल, त्यांचे कुटुंबीय व कार्यकर्त्यांना मिळत राहतात.

आबा बागुल यांच्या कार्यावरचा दृष्टिक्षेप

  • राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल
  • पंडित भीमसेन जोशी कलादालन
  • तळजाई टेकडीवरील सदू शिंदे स्टेडियम
  • सेव्हन वंडर पार्क
  • म्युझिकल फाउंटन
  • लेझर शो
  • दादासाहेब फाळकेफोर-डी थिएटर
  • मा. विलासराव देशमुख थ्रीडी तारांगण
  • भुलभुलय्या प्रकल्प”
  • विजय तेंडुलकर नाट्यगृह
  • हॅलो माय फ्रेंडउपदेशन हेल्पलाइन
  • कउढचठ प्रकल्पाला गती

सामाजिक प्रकल्प

  • गणेशोत्सव
  • नवरात्र महोत्सव”
  • अंध नागरिकांना दिवाळी पहाट
  • क्रिसमस संध्या
  • काशी यात्रा
  • अष्टविनायक यात्रा
  • रामेश्‍वर यात्रा
  • महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग यात्रा
  • सांगलीतील पूरग्रस्तांना मदत कार्य”
  • करोना काळात 1 लाख लोकांना मोफत जेवण
  • गोरगरीब मुलांसाठी सर्कस, चित्रपट महोत्सवाचे आयोजन
  • मोफत शैक्षणिक सहलीचे आयोजन
  • गोरगरिबांना इंदिरा गांधी आरोग्य आधार योजना

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

2026-10-06 18:54:29

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून