Amravati Hospital: ‘आमचे बाळ परत द्या…’ ९ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पदरी फक्त दु:खचं, रुग्णालयाबाहेर पालकांचा आक्रोश
Amravati Hospital: रुग्णालयातील नवजात बालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

Amravati Hospital: अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात सोमवारी पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. यात तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर सहा बालकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी चार बालकांवर उपचार सुरू असून एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेनंतर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात मृत बालकांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ‘आमचे बाळ आम्हाला परत द्या’ असा हंबरडा फोडत नातेवाईकांनी दु:ख व्यक्त केले.
मृत बालकांना शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होताच नातेवाईकांनी त्याला तीव्र विरोध केला. ‘आमचे बाळ आम्हाला परत द्या’, ‘बाळाला पोस्टमार्टमसाठी घेऊन जाऊ नका’, अशी आर्त विनवणी करीत त्यांनी हंबरडा फोडला. अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात मृत बालकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
आईने 9 महिने वेदना करुन मुलाला जन्म दिला अन्…
तर एका आईने 9 महिने वेदना सहन करुन मुलाला जन्म दिल्यानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र आपले मुलं गमावल्याचे समजताच बापानेही हबंरडा फोडला आहे. ‘गरीबाचे पोर मारले’ असे म्हणत पालक आपला आक्रोश व्यक्त करत आहे.
या दुर्घटनेने रुग्णालयातील नवजात बालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला आहे. आगीचे नेमके कारण आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी तपासणीनंतर स्पष्ट होणार आहेत.
या घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ३ नवजातांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
हेही वाचा:
Taapsee Pannu Post: ‘स्वस्त कॉपी’ म्हणत कंगनाचा तापसीवर निशाणा; अभिनेत्रीचं सूचक उत्तर, म्हणाली…!






