अमिताभ यांच्या कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनय कारकिर्दीला आज 52 वर्षे पूर्ण झाली. 1969 साली आजच्याच दिवशी त्यांचा पहिला सिनेमा “सात हिंदुस्तानी’ रिलीज झाला होता. तेव्हापासून आजपर्यंत ते रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहेत. कारकिर्दीला 52 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर एक विशेष पोस्ट टाकली आहे.
View this post on Instagram
गेल्या 52 वर्षांत त्यांनी साकारलेल्या सर्व विशेष भूमिकांच्या फोटोंचे एक कोलाज करून त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. सात हिंदुस्तानींपासून यावर्षी रिलीज होणाऱ्या ते मेडेपर्यंत प्रत्येकाचा लूक अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टमध्ये दाखवला गेला आहे. त्यांच्या या पोस्टला खूप लाईक मिळत आहेत.
View this post on Instagram
52 वर्षे सरली. एवढे सगळे कसे झाले याचाच आपण विचार करत होतो, असे बिग बी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांना 15 फिल्मफेअर पुरस्कार, 4 आयफा पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, पीकू, पा, ब्लॅक आणि अग्निपथ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावर्षी मार्च महिन्यात त्यांना एफआयएएफ 2021 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.





