करोनाच्या काळात अनेक लोक पिचले गेले आहेत. अनेक लोक गरजूंच्या मदतीसाठी पुढे धावले आहेत. काही लोक गुपचूप मदत करून निघून जातात. तर काही लोक त्याचे फोटो काढून शेअर करतात. भरपूर गाजावाजा करतात.
View this post on Instagram
काही लोकांना तर आता माध्यमांनी आणि चाहत्यांनीच मसिहा बनवून टाकले आहे. त्यांनी केलेली किंवा न केलेली अशा सगळ्याच मदतींचे ढोल वाजवले जात आहेत. त्याबद्दल बाहुबलीची स्टार तमन्ना भाटियाने एका मुलाखतीत आपली भूमिका मांडली आहे.
View this post on Instagram
तमन्ना म्हणते की, मदत करणे चांगले आहे. मात्र, त्याचा दिखावा कशाला केला जातो. तुम्ही कशात काय आणि किती योगदान दिले हे सांगण्याची आवश्यकता नसते. मात्र, तसे का केले जाते तेही समजत नाही. अर्थात सध्याच्या काळात सेलिब्रिटींवर त्यांनी इतरांना मदत करावी यासाठी प्रचंड दबाव असल्याचेही ती नमूद करते.
View this post on Instagram
त्या लोकांनी कितीही मदत केली तरी लोकांची अपेक्षा असते की त्यांनी अजून मदत करावी. मात्र, तरीही मदतीचा डांगोरा पिटणे आपल्याला योग्य वाटत नसल्याचे ती सांगते. आपल्याकडे नेहमी म्हटले जाते की, मदत अशा लोकांना करा ज्यांना खरी गरज आहे.
View this post on Instagram
तसेच मदत अशी करा की तुमच्या दुसऱ्या हातालाही त्याची माहिती होणार आहे. मात्र, शोबीझ वाल्यांनी मदतीचाही इव्हेंट केला आहे हे नाकारता येत नाही. प्रत्येक जण स्वत:ला चमकवण्याच्या आणि प्रकाशात राहण्याच्या प्रयत्नात असतो.
View this post on Instagram
कामाच्या संदर्भात बोलायचे झाले तर तमन्ना सध्या पाच चित्रपट करते आहे. यातील चार तेलगु भाषेतील आहेत, तर एक हिंदी आहे. हिंदीत ती बोले चुडीयॉं हा सिनेमा करते आहे. तेलगुत ती सुपरस्टारच आहे. तेथील सगळ्या बड्या स्टार्ससोबत तिने काम केले आहे. तिला डिमांडही खूप आहे.