सिडनी – ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर (SCG) 03 जानेवारी 2024 पासून खेळवला जाईल. हा सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात कोणताही बदल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा एक खेळाडू कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तो खेळाडू दुसरा कोणी नसून डेव्हिड वॉर्नर आहे.
पाकिस्तानविरुद्धची तिसरी कसोटी येथे येत्या 3 जानेवारीपासून सुरु होत आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता अखेरच्या कसोटीत सलामावीर डेव्हिड वॉर्नर खेळणार असून ही त्याची कारकीर्दीतील अखेरची कसोटी ठरणार आहे. या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्दीतून निवृत्ती जाहीर करणार आहे.
या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका खेळणार असून त्यात सलामीवीर म्हणून उस्मान ख्वाजासह कोण सलामीला फलंदाज करणार असा प्रश्न सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळासमोर निर्माण झाला आहे. सिडनी कसोटीद्वारे वॉर्नर आपल्या घरच्याच मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळणार असून मेलबर्न कसोटीत खेळवलेलाच संघ याही कसोटीसाठी कायम ठेवण्यात आला आहे.
वॉर्नर सध्याच्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. 37 वर्षीय खेळाडूने 111 वेळा देशासाठी प्रदीर्घ फॉर्मेट(कसोटी क्रिकेट) खेळला आहे. या कालावधीत वॉर्नरने एकूण 8 हजार 695 धावांची नोंद केली आहे. वॉर्नरच्या धावा 44.58 च्या सरासरीने आल्या आहेत आणि त्याने 26 शतके आणि 36 अर्धशतके झळकावली आहेत ज्यात पाकिस्तान विरुद्ध नाबाद 335* च्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
#NZvBAN 3rd T20I : चार टॉप-5 फलंदाजांनी एकूण 4 धावा केल्या, तरीही न्यूझीलंडने जिंकला ‘असा’ सामना…
न्यू साउथ वेल्समध्ये जन्मलेला फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकावर आहे, तो त्याचा सहकारी स्टीव्ह स्मिथ आणि माजी खेळाडू स्टीव्ह वॉ, अॅलन बॉर्डर आणि रिकी पाँटिंग यांच्या मागे आहे.