IND vs ENG : अंपायरने वाचवलं पण नशीब निघालं खराब…! यशस्वी जैस्वालच्या विकेटचा VIDEO व्हायरल

IND vs ENG 5th Test Yashasvi Jaiswal Wicket Video : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सध्या सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ऑली पोप याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय वेगवान गोलंदाज गस एटकिन्सनने भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला अवघ्या दोन धावांवर बाद योग्य ठरवला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एटकिन्सनने जैस्वालला दाखवला तंबूचा रस्ता –
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज एटकिन्सनच्या चेंडूने जैस्वालला चकवले. त्याचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा पडून आत येताच त्याने दिशा बदलली. जैस्वालने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याची बॅट चुकीच्या कोनात आली आणि चेंडू त्याच्या मागील पायावर जाऊन लागला. इंग्लंडने पायचितसाठी जोरदार अपील केली, पण मैदानी पंचांनी ही विनंती फेटाळली.
रिव्ह्यूने घेतली जैस्वालची विकेट-
🧵 WICKETS THREAD 🧵
Catch every England wicket from The Kia Oval 🇮🇳👇
— England Cricket (@englandcricket) July 31, 2025
मैदानी पंचांना वाटले की चेंडू बॅटच्या काठाला लागला आहे. पण एटकिन्सन आणि कर्णधार ओली पोप यांना विश्वास होता की चेंडू फक्त पायावर लागला आहे. त्यांनी डीएरएस घेतला. यानंतर रीप्लेमध्ये स्पष्ट झाले की चेंडूला बॅटच्या कोणत्याही भागाचा स्पर्श झालेला नव्हता. चेंडू प्रथम पायावर आणि नंतर मागील पायावर लागला होता. बॉल ट्रॅकिंगने दर्शवले की चेंडू थेट मिडल स्टंपवर आदळत होता. यामुळे मैदानी पंचांचा निर्णय बदलला गेला आणि जैस्वाल ९ चेंडूत २ धावा काढून बाद झाला.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलचा इंग्लंडमध्ये दबदबा! गावस्कर-सॉबर्स यांचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
ड्रेसिंग रूममध्ये स्टोक्सही झाला आनंदित –
कर्णधार ऑली पोप याने यशस्वी रिव्ह्यूचा आनंद इंग्लंडच्या ड्रेसिंग रूमकडे बोट दाखवून साजरा केला. दुखापतीमुळे खेळत नसलेला बेन स्टोक्स यानेही ड्रेसिंग रूममधून या निर्णयाचे कौतुक केले. हा उकर्णधाराचा उत्तम निर्णय आणि अचूक गोलंदाज यांचा उत्तम नमुना होता, ज्याने इंग्लंडला या महत्त्वाच्या सामन्यात शानदार सुरुवात मिळवून दिली.





