IND vs WI : यशस्वी जैस्वालने शतकासह WTC मध्ये केली कमाल! आता फक्त रोहित शर्माचं पुढे

Yashasvi Jaiswal centuries as opener in WTC : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर सलामीवीर यशस्वी जैस्वालने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा सामना करताना दमदार खेळी सादर केली आणि शानदार शतक ठोकले. त्याला युवा फलंदाज साई सुदर्शनने चांगली साथ दिली. ज्यामुळे भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर 2 बाद 318 धावा केल्या आहेत.
यशस्वी जैस्वालचे शानदार शतक –
यशस्वी जैस्वालने 253 चेंडूंमध्ये 173 धावांची खेळी केली, ज्यामध्ये २२ चौकारांचा समावेश आहे. तो अद्यापही खेळपट्टीवर टिकून आहे. त्याने सामन्याच्या सुरुवातीपासूनच संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर चांगली धावसंख्या उभारली आहे. साई सुदर्शन 87 आणि केएल राहुल ३८ धावा काढून बाद झाले. कर्णधार शुबमन गिल २० धावांवर नाबाद आहे.
That will be Stumps on Day 1️⃣
1️⃣7️⃣3️⃣*for Yashasvi Jaiswal 🫡
8️⃣7️⃣ for Sai Sudharsan 👏
3️⃣1️⃣8️⃣/2️⃣ for #TeamIndiaCaptain Shubman Gill and Yashasvi Jaiswal will resume proceedings on Day 2. 👍
Scorecard ▶ https://t.co/GYLslRzj4G#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/mRdU9jXIy3
— BCCI (@BCCI) October 10, 2025
जैस्वालची डब्ल्यूटीसीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर झेप –
🎥 Play that on loop ➿
Yashasvi Jaiswal with a memorable day for #TeamIndia 😍
Scorecard ▶ https://t.co/GYLslRzj4G#INDvWI | @IDFCFIRSTBank | @ybj_19 pic.twitter.com/Q9m93uksHi
— BCCI (@BCCI) October 10, 2025
यशस्वी जैस्वालने सलामीवीर म्हणून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये हे सहावे शतक ठोकले आहे. यासह तो डब्ल्यूटीसीमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने आणि ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा यांच्याशी बरोबरी केली आहे. या दोघांनीही सलामीवीर म्हणून डब्ल्यूटीसीमध्ये प्रत्येकी 6 शतके ठोकली आहेत. सलामीवीर म्हणून डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर आहे, ज्याने 9 शतके ठोकली आहेत.
हेही वाचा – Sourav Ganguly : ‘असं सर्वांसोबतचं होतं…’, रोहितच्या जागी गिल कर्णधार होताच सौरव गांगुलीने सांगितलं सत्य!
- रोहित शर्मा – 9
- यशस्वी जायसवाल – 6
- दिमुथ करुणारत्ने – 6
- उस्मान ख्वाजा – 6
- अब्दुल्ला शफीक – 5
- केएल राहुल – 5
- डेव्हिड वॉर्नर – 5
हेही वाचा – IND W vs SA W : ऋचा घोषने दाखवलं रौद्र रूप! एकाच झटक्यात मोडले अनेक विक्रम
यशस्वी जैस्वालने ठोकले सातवे कसोटी शतक –
यशस्वी जैस्वालने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच कसोटी पदार्पण केले होते. तेव्हापासून तो भारतीय संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे. त्याने 26 कसोटी सामन्यांमध्ये 7 शतके आणि 12 अर्धशतकांसह 2356 धावा केल्या आहेत. खेळपट्टीवर एकदा स्थिरावल्यानंतर त्याला बाद करणे गोलंदाजांसाठी अत्यंत कठीण ठरते. याशिवाय, त्याने 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 723 धावा केल्या आहेत. जैस्वालच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत आहे.





