Yashasvi Jaiswal Century : यशस्वीचा ‘धूम’ धमाका! ४८ चेंडूंत शतक ठोकत मुंबईला हरियाणाविरुद्ध मिळवून दिला विजय

Yashasvi Jaiswal Century Mumbai beat Haryana : सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतील थरारक सामन्यात मुंबईने हरियाणाचा ४ विकेट्सने पराभव करत हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालने अवघ्या ४८ चेंडूत तडाखेबंद शतक ठोकत, मुंबईला १५ चेंडू आणि ४ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
पुण्यातील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हरियाणाच्या फलंदाजांनी मात्र मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरशः झुंजवले. सलामीवीर अर्श रांगाने २६ धावा करून चांगली सुरुवात दिली. यानंतर कर्णधार अंकित कुमार आणि निशांत सिंधू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११० धावांची जबरदस्त भागीदारी रचली.
हरियाणाची धावांची बरसात –
YASHASVI JAISWAL BRINGS UP A 48-BALL CENTURY!
A breathtaking hundred off just 48 balls against Haryana
Came while chasing a massive 235-run target in SMAT 2025#YashasviJaiswal #SMAT2025 #Cricket pic.twitter.com/NLNkpysKyR
— Arshit Yadav (@imArshit) December 14, 2025
अंकित कुमारने ४२ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला निशांत सिंधूची चांगली साथ मिळाली, ज्याने ३८ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ६३ धावा फटकावून अर्धशतक पूर्ण केले. अखेरीस, समंत जाखरच्या ३१ आणि सुमित कुमारच्या १६ धावांच्या योगदानामुळे हरियाणाने मुंबईसमोर २३५ धावांचे डोंगराएवढे आव्हान उभे केले. मुंबईसाठी साईराज पाटीलने २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – IND U19 vs PAK U19 : हेल्मेटवर चेंडू लागला, तरी डगमगला नाही! जॉर्जने झुंजार खेळी साकारत सावरला भारताचा डाव
यशस्वी आणि सर्फराझची शानदार भागीदारी –
भारतीय क्रिकेट टीम के चयनकर्ताओ / Shubman Gill के चहेतो अपनी आंखें खोलो और मुम्बई और हरियाणा का सईद मुस्ताक अली ट्रॉफी के मैच में Yashasvi Jaiswal की पारी देखो । अगर शर्म आ जाये तो चुल्लू भर पानी मे डूब मरना ।
Abhishek Sharma#SMAT#bondibeach #YashasviJaiswal pic.twitter.com/hpKpS4r9Qz— Cop Satish Yogi (@jogiyasatish) December 14, 2025
हरियाणाच्या २३५ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे अवघ्या २१ धावांवर बाद झाला. मात्र, एका बाजूला यशस्वी जैस्वालने किल्ला लढवला, त्याला सर्फराझ खानने तुफान साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.
सर्फराझ खानने मैदानात येताच चौफेर फटकेबाजी करत केवळ २५ चेंडूंत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ६४ धावांची वेगवान खेळी केली आणि सामन्याचे चित्र पालटले. सर्फराझ बाद झाल्यानंतरही यशस्वीने आपला धडाका सुरूच ठेवला. त्याने अथर्व तायडेच्या साथीने खेळताना, केवळ ४८ चेंडूंत आपले शानदार शतक पूर्ण केले. विजयासाठी आवश्यक धावा पूर्ण होताच यशस्वी बाद झाला.
या रोमांचक सामन्यात, अथर्व तायडेने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून मुंबईला १५ चेंडू शिल्लक असतानाच ४ विकेट्सने विजय मिळवून दिला. हरियाणाकडून समंत जाखरने २, तर अंशुल कंबोज आणि अमित राणा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. यशस्वी जैस्वालच्या या अविस्मरणीय शतकी खेळीमुळे मुंबईने स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.





