Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने रचला इतिहास! जगातील कोणत्याच खेळाडूला न जमलेला केला पराक्रम

Yashasvi Jaiswal create histiory in IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सला सलग पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान संघाचा ११ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २० षटकांत ५ गडी गमावून २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, राजस्थान संघाला ९ विकेट्स गमावल्यानंतर फक्त १९४ धावा करता आल्या. त्याच वेळी, यशस्वी जैस्वालने राजस्थानच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून मोठा पराक्रम केला आहे.
यशस्वी जैस्वालने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारविरुद्ध पहिल्याच चेंडूवर लेग साईडवर शानदार षटकार मारला. यासह, यशस्वी जैस्वाल आयपीएल सामन्यात तीन वेगवेगळ्या संघाविरुद्ध पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला. इतर कोणत्याही फलंदाजाने ही कामगिरी एकापेक्षा जास्त वेळा केलेली नाही. आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्या चेंडूवर आतापर्यंत आठ फलंदाजांनी षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
यशस्वी जैस्वालने रचला इतिहास –
#ViratKohli के रिकॉर्ड के साथ #RCB की इस सीज़न पहली जीत 😳#YashasviJaiswal पहली गेंद पर 3 बार छक्का लगाने वाले इकलौते बल्लेबाज़ 🤯
🗣️@imsyedhussain#RCBvRR #IPLRecords #IPL2025 #NumberKaKhel pic.twitter.com/KXnawzGrWA
— ESPNcricinfo हिंदी (@CricinfoHindi) April 24, 2025
मात्र, यशस्वी जैस्वाल हा एकमेव असा खेळाडू आहे, ज्यांनी तीनदा असा पराक्रम केला आहे. या यादीत नमन ओझा, मयंक अग्रवाल, सुनील नरेन, विराट कोहली, रॉबिन उथप्पा, फिल सॉल्ट आणि प्रियांश आर्य यांचा समावेश आहे. सामन्याबद्दल बोलायचे, तर विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या शानदार अर्धशतकांच्या आणि जोश हेझलवूडच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा ११ धावांनी पराभव केला.
हेही वाचा – Rajasthan Royals : ९ सामन्यांत फक्त २ विजय, तरीही राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये कसा पोहोचू शकतो?
यशस्वी जैस्वालची ४९ धावांची खेळी ठरली व्यर्थ –
गुरुवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, आरसीबीने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत पाच गडी गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानला निर्धारित षटकांत नऊ गडी गमावून केवळ १९४ धावा करता आल्या. त्यांच्याकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक ४९ धावा केल्या. आरसीबीकडून हेझलवूडने चार तर कृणाल पंड्याने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.





