Rajasthan Royals : ९ सामन्यांत फक्त २ विजय, तरीही राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये कसा पोहोचू शकतो?

Rajasthan Royals IPL 2025 Playoff qualification scenario : आयपीएल २०२५ राजस्थान रॉयल्ससाठी एका दुःस्वप्नापेक्षा कमी राहिले नाही. हंगामाच्या सुरुवातीला, संघाचा नियमित कर्णधार संजू सॅमसन पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे प्रभावशाली खेळाडू म्हणून खेळला, त्यानंतर रियान परागने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. यानंतर संजू कर्णधार म्हणून परतला. तरीही, संघाचे नशीब बदलू शकले नाही. आता संघाने ७ सामने गमावले आहेत, पण प्लेऑफमध्ये पोहोचण्याची अजूनही थोडीशी आशा आहे.
राजस्थान रॉयल्सची सध्याची स्थिती –
राजस्थानने आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत. त्यामुळे चार गुणांसह, त्याचा नेट रन रेट उणे ०.६२५ आहे. जर आपण पॉइंट्स टेबलमध्ये त्याचे स्थान पाहिले तर तो आठव्या स्थानावर आहे. अजून त्यांचे पाच सामने बाकी आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्याही संघाला किमान १६ गुणांची आवश्यकता असली तरी, राजस्थान ज्या परिस्थितीत आहे, त्यात त्यांना १६ गुणांपर्यंत पोहोचणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत, कोणताही संघ १४ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल का, असा प्रश्न उपस्थित होतो.
राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचेल का?
IPL 2025 POINTS TABLE. 📈
– GT, DC & RCB with 12 Points each. 🤯 pic.twitter.com/seXbNNHwwv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 24, 2025
बऱ्याच वेळा प्लेऑफची परिस्थिती अशी होती की संघ १४ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत, राजस्थानसाठी आता कोणते समीकरण तयार होत आहे ते जाणून घेऊया. जर आपण आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे प्रत्येकी १२ गुणांसह प्लेऑफचे सर्वात प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय मुंबई इंडियन्स, लखनौ सुपरजायंट्स आणि पंजाब किंग्ज देखील शर्यतीत आहेत, कारण या तिन्ही संघांचे १०-१० गुण आहेत.
हेही वाचा – RCB vs RR : आरसीबीचा घरच्या मैदानावर पहिला विजय! राजस्थानचा सलग पाचवा पराभव
पॉइंट टेबलच्या सध्याच्या स्थितीनुसार, राजस्थानला कोणतीही संधी दिसत नाही, कारण सर्व संघ त्यांच्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहेत. मात्र, जर अव्वल संघांविरुद्ध मोठा उलटफेर झाला आणि त्यांना सलग सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला तर परिस्थिती बदलू शकते. परंतु त्यासाठी राजस्थानला त्यांचे उर्वरित सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील. फक्त जिंकूनच नाही तर त्यांना त्यांचा नेट रेन रेटही सुधारावा लागेल. जर त्यांनी उर्वरित सर्व सामने जिंकले, तर त्यांचे १४ गुण होऊ शकतात. राजस्थानसाठी फक्त १४ गुण मिळवणे पुरेसे ठरणार नाही. कारण त्यांना इतर संघाच्या निकालावरही अवलंबून राहावे लागले.





