Yami Gautam: आर्मी डे निमित्त यामी गौतमचा जवानांना सलाम; ‘आर्टिकल 370’मधील दृश्य शेअर करत म्हणाली, “आज आणि दररोज… जय हिंद!”

Yami Gautam : देशभरात दरवर्षी १५ जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो. देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या भारतीय सैन्याच्या शौर्य, बलिदान आणि शिस्तीला या दिवशी मानवंदना दिली जाते. या खास दिवशी बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम हिनेदेखील भारतीय सेनेला अनोख्या पद्धतीने सलाम केला आहे.
यामी गौतमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर तिचा चित्रपट ‘आर्टिकल 370’ मधील काही महत्त्वाची दृश्य शेअर केली आहेत. त्या पोस्टसोबत तिने,
“हॅपी आर्मी डे. आज आणि दररोज. जय हिंद!” असा भावनिक संदेश दिला आहे. यामीची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याचं कौतुक केलं जात आहे.
‘आर्टिकल 370’ हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक राजकीय थ्रिलर असून त्याचं दिग्दर्शन आदित्य सुहास जांभले यांनी केलं आहे. या चित्रपटात यामी गौतमसोबत प्रियामणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, वैभव तत्ववादी, अरुण गोविल आणि किरण कर्माकर यांच्याही भूमिका आहेत.
View this post on Instagram
यामी गौतमचा वर्क फ्रंट
कामाच्या आघाडीवर बोलायचं झालं, तर यामी गौतम सध्या तिच्या ‘हक’ या कोर्टरूम ड्रामाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुपर्ण वर्मा यांनी केलं असून यामीसोबत इमरान हाशमी आणि शीबा चड्ढा प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट शाह बानो प्रकरणावर आधारित असून पत्रकार जिग्ना वोरा यांच्या ‘बानो : भारताची मुलगी’ या पुस्तकाचा संदर्भही यात घेण्यात आला आहे. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला ‘हक’ हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. यामीच्या अभिनयाचं अनेक कलाकारांनी कौतुक केलं आहे.





