Yami Gautam : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट अजूनही बॅाक्स अॅाफिसवर टिकून आहे. ५ डिसेंबर या दिवशी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला काही दिवसांत एक महिना पूर्ण होणार आहे. असे असले तरीही चित्रपटाची क्रेझ कायम आहे. चित्रपटात रहमान डकैतची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय खन्नाच्या हूक स्टेप्सने सर्वांनाच वेड लावले आहे. या गाण्याने सर्वांनाच भूरळ पाडली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरचे कौतुक केले जात आहे. अशातच त्याची पत्नी अभिनेत्री यामी गौतम हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदित्य आणि तिच्या लग्नाबद्दल काही गोष्टींचा खुलासा केला आहे. कोणत्याही फिल्मी ड्रामाशिवाय त्यांचे नाते कसे फुलले याबाबत यामीने सांगितले आहे. आदित्य धरचा ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’हा चित्रपट आला होता, तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमाचे नाते तयार झाल्याचे यामीने स्पष्ट केले. आदित्यचा साधेपणा यामीला खूप भावला. दोघांमध्ये प्रेम झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न साध्या पद्धतीने केले. लग्नातील एक आठवण यामीने शेअर केली. लग्नात मी माझा मेकअप स्वतः केला. मला वाटले होते की ते खूप कठीण असेल, पण ते सोपे होते, अशी आठवण यामीने शेअर केली. पती आदित्य धरविषयी बोलताना यामी म्हणाली, तो असा माणूस आहे जो आजच्या काळात सापडणे कठीण आहे, अशा शब्दांत तिने आदित्य धरचे कौतुक केले. उरी चित्रपटाच्या सेटवरील एका किश्शांची आठवणही तिने शेअर केली. ‘उरी’च्या सेटवर ती जमिनीवर बसून जेवण करत असताना आदित्यने तिला त्याच्या दिग्दर्शकाची खुर्ची देऊ केली होती. हेही वाचा : बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांनी हिंदूंची जाळली घरे ; ७ वर्षांच्या चिमुकलीचा होरपळून मृत्यू