MH Govt Decision : शिवसेना ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; तातडीने Y+ दर्जाची सुरक्षा
MH Govt Decision : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून संबंधित खासदारांना तातडीने वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने दिले आहेत.

MH Govt Decision : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून संबंधित खासदारांना तातडीने वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा प्रदान करण्याचे आदेश राज्याच्या गृह विभागाने दिले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांनी १७ जून रोजी जारी केलेल्या अधिकृत संदेशाद्वारे सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांना संबंधित खासदारांना त्वरित सुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा – ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का; खासदारांनंतर आता मुंबईत नगरसेवक संख्या कमी होणार
वाय प्लस सुरक्षा मिळालेल्या खासदारांमध्ये यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे.
डरपोक (गांडू) !
ऑपरेशन “तुडवा ” इफ़ेक्ट
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/DDWBdkHIVu— Sanjay Raut (@rautsanjay61) June 18, 2026
‘ऑपरेशन तुडवा’
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली. “आमच्या पक्षाच्या आणि चिन्हाच्या बळावर निवडून आलेल्या खासदारांनी हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावे,” असे आव्हान त्यांनी दिले.
तसेच, “गद्दारांविरोधात आता आम्ही ‘ऑपरेशन तुडवा’ राबविणार आहोत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे कृत्य करण्यात आलेय. जर या खासदारांना कोणताही धोका नसेल, तर सरकारने त्यांना तातडीने वाय प्लस सुरक्षा का दिली?” असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.
या घडामोडींमुळे ठाकरे व शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र असून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.





