Xiamen Diamond League 2023 : अविनाश साबळेची राष्ट्रीय विक्रमाला गवसणी
Updated On:

नवी दिल्ली :- भारताचा 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीचा स्टार धावपटू अविनाश साबळे याने चीनमधील झिमेन डायमंड लीग ऍथलेटिक्स स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम साकार केला. या कामगिरीच्या जोरावर तो युजिनला येत्या 16 व 17 सप्टेंबरला होत असलेल्या अंतिम फेरीसाठीही पात्र ठरला आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेतील अपयश पुसुन काढताना साबळेने चमकदार कामगिरी केली आहे. या शर्यतीत त्याने पाचवे स्थान मिळवले.
युजिनला होत असलेल्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेला साबळे भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि लांब उडी क्रीडा प्रकारातील अव्वल खेळाडू श्रीशंकर मुरलीनंतर भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे.





