WTC 2025 Final : ऑस्ट्रेलियाची वाढली चिता! WTC फायलनमध्ये स्टार खेळाडूला झाली दुखापत, पाहा VIDEO

WTC 2025 Final Steve Smith injured at Lords : लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी २०२५ च्या फायनल्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथला दुखापत झाली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील २०व्या षटकात क्षेत्ररक्षण करताना स्मिथच्या बोटाला दुखापत झाली. जेव्हा मिचेल स्टार्क टाकलेला चेंडू कर्णधार टेम्बा बावुमाच्या बॅटची बाहेरील कड घेऊन मागे वेगाने आला, तेव्हा स्लिपमध्ये स्मिथ हेल्मेट घालून पहिल्या स्लिपच्या नेहमीच्या जागेपेक्षा पुढे उभा होता.
स्मिथला चेंडच्या गती आणि उसळीने चकवले –
स्टीव्ह स्मिथला चेंडूच्या गतीने आणि उसळीने चकवा दिला, ज्यामुळे त्यांनी एक महत्त्वाचा झेल सोडला. त्या वेळी टेम्बा बावुमा फक्त २ धावांवर खेळत होता. झेल सोडताना स्मिथच्या एका बोटाला जोरदार दुखापत झाली, ज्यामुळे त्याला खूप वेदना होत असल्याचे दिसले. यानंतर ऑस्ट्रेलियन सपोर्ट स्टाफ तातडीने मैदानावर आला आणि स्मिथला उपचारासाठी बाहेर नेले. यानंतर त्याच्या जागी सॅम कॉन्स्टासला पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून मैदानावर पाठवण्यात आले.
स्मिथला रुग्णालयात दाखल करण्यात आले –
View this post on Instagram
ड्रेसिंग रूमनंतर स्टीव्ह स्मिथला रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीत कंपाउंड डिसलोकेशन झाले आहे. म्हणूनच त्याला रुग्णालयात जावे लागले. ऑस्ट्रेलियाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘लॉर्ड्स येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्लिपमध्ये फिल्डिंग करताना स्टीव्ह स्मिथला उजव्या करंगळीत कंपाउंड डिसलोकेशन झाले. मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्याला एक्स-रे आणि पुढील उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.’
हेही वाचा – WTC 2025 Final : मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडने केला विश्वविक्रम! ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिलीच जोडी
आता स्टीव्ह स्मिथला सामन्यात भाग घेणे अशक्य आहे. तो गोलंदाजी करत नाही आणि ऑस्ट्रेलियाचे दोन्ही डाव संपले आहेत. त्यामुळे संघाला त्याची फारशी उणीव भासणार नाही. तथापि, स्मिथला कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे आणि तो संघाचा उपकर्णधार देखील आहे. संघाला त्याच्या नेतृत्वाची उणीव नक्कीच जाणवेल. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर २८२ धावांचे लक्ष्य आहे.





