Wrestling : सिकंदर सलग दुसऱ्यांदा ठरला ‘भीमा केसरी’चा मानकरी…

पुणे – महाराष्ट्राचा प्रख्यात कुस्तीपटू सिकंदर शेख याने यंदाच्या भिमा केसरी कुस्ती स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळवला. त्याने पंजाब केसरी प्रदीपसिंग जिरगपूरला चितपट करत भीमा केसरी किताब घेण्याची किमया दुसऱ्यांदा साध्य केली आहे.
राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा प्रदान करत सिकंदर शेख याचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेचे आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी कारखाना कार्यस्थळावर केले होते. भीमा केसरीच्या किताबासाठी झालेल्या लढतीत दोन्ही ही पैलवान हे तुल्यबळ होते.
WFI Controversy : भारतीय कुस्तीला जीवदान द्या; नवोदित कुस्तीगिरांची मागणी…
पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर विरुद्ध महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अशी कडवी लढत झाली. १५ व्या मिनिटाला आक्रमक खेळणाऱ्या सिकंदरसमोर प्रदीपसिंगचा निभाव लागला नाही. प्रदीपसिंगला चितपट करून सलग दुसऱ्यांदा भीमा केसरी होण्याचा बहुमान सिकंदर शेख याने पटकाविला.





