WPL 2024 ( #MIvRCB Match 19 ) : आरसीबीचा गोलंदाजीचा निर्णय..! मुंबई संघात 1 बदल, जाणून घ्या, दोन्ही संघाचे Playing 11

WPL Live Cricket Score, MI vs RCB Women’s Premier League 2024 : आज, महिला प्रीमियर लीग 2024 च्या 19 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हरमनप्रीत कौरच्या मुंबई संघाचे लक्ष अव्वल स्थानावर आहे, तर बंगळुरूचे लक्ष अव्वल तीन स्थानावर असेल. अव्वल तीन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील. मुंबई आणि दिल्ली आधीच पात्र ठरले आहेत. तिसऱ्या स्थानासाठी बेंगळुरू आणि यूपी यांच्यात स्पर्धा आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मंधाना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंधानाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचबरोबर मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे यष्टिका भाटियाला विश्रांती देण्यात आली आहे. प्लेइंग-11 मध्ये तिच्या जागी यष्टिरक्षक प्रियांका बालाचा समावेश करण्यात आला आहे.
MI vs RCB : दोन्ही संघाचं Playing 11 खालीलप्रमाणे…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना (कर्णधार), सोफी मोलिनक्स, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेरेहम, दिशा कसाट, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका सिंग.
Playing XI’s of both teams 👀
1️⃣ change for @mipaltan as Priyanka Bala comes in for Yastika Bhatia while @RCBTweets remain unchanged
Live 💻📱https://t.co/6mYcRQlhHH#TATAWPL | #MIvRCB pic.twitter.com/Ddnc4sQtvO
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 12, 2024
मुंबई इंडियन्स : हेली मॅथ्यूज, नॅट सीव्हर-ब्रंट, प्रियांका बाला (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया कर, अमनजोत कौर, एस सजना, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ranji-trophy-2023-24-final-mumbai-on-the-brink-of-victory-a-challenge-of-538-runs-in-front-of-vidarbha/
दरम्यान, आरसीबी संघाने हा सामना जिंकल्यास अव्वल तीनमधील त्यांचे स्थान निश्चित होईल. दुसरीकडे, ते हरले तर त्यांना यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या सामन्यावर निर्भर रहावं लागू शकते. मग एकतर निव्वळ रन रेट किंवा गुणांच्या फरकाने, कोणताही संघ पहिल्या तीनमध्ये प्रवेश करू शकतो. दिल्ली कॅपिटल्ससह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानासाठीच्या लढाईत मुंबई इंडियन्सची स्थिती सारखीच आहे.





