Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेने घेतला धक्कादायक निर्णय! एक्सवर पोस्ट शेअर करत दिली माहिती

अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
अजिंक्य रहाणेने आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिले, “मुंबई संघाचे कर्णधारपद सांभाळणे आणि विजेतेपद मिळवणे हा माझ्यासाठी सन्मानाचा क्षण होता. आगामी देशांतर्गत हंगामाच्या पार्श्वभूमीवर, नव्या कर्णधाराला तयार करण्याची ही योग्य वेळ आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी कर्णधारपदाची जबाबदारी पुढे न सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. मी एक खेळाडू म्हणून माझे सर्वोत्तम योगदान देण्यास पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबत माझा प्रवास सुरू ठेवून आणखी ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहीन. या हंगामाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”
रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई दोनदा चॅम्पियन –
Captaining and winning championships with the Mumbai team has been an absolute honour.
With a new domestic season ahead, I believe it’s the right time to groom a new leader, and hence I’ve decided not to continue in the captaincy role.
I remain fully committed to giving my best…
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) August 21, 2025
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०२३-२४ हंगामात रणजी करंडक जिंकून सात वर्षांचा दुष्काळ संपवला. तसेच, २०२४-२५ हंगामात मुंबईने इराणी करंडकावरही नाव कोरले. कर्णधारपद सोडल्यानंतरही रहाणेने निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले असून, तो सर्व फॉर्मेट्समध्ये फलंदाज म्हणून मुंबईसाठी खेळत राहणार आहे.
हेही वाचा – “अजूनही चालायला आणि बोलायला त्रास, आरोग्यासाठी प्रार्थना करा”; भावाने दिली विनोद कांबळींची हेल्थ अपटेड
मुंबईचा पुढचा कर्णधार कोण?
मुंबईच्या संघात श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि सर्फराझ खान यांसारखे अनुभवी खेळाडू आहेत. जैस्वाल आणि सर्फराझ यांना कर्णधारपदाचा अनुभव नसला, तरी अय्यरने तीन आयपीएल फ्रँचायझींचे नेतृत्व केले आहे, तर सूर्यकुमार यादव सध्या भारताचा टी-२० कर्णधार आहे. जैस्वालच्या कसोटी सामन्यांमुळे त्याची उपलब्धता मर्यादित असू शकते, त्यामुळे निवड समिती हंगामात जास्त काळ उपलब्ध असणाऱ्या कर्णधाराला प्राधान्य देऊ शकते. यामुळे श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे रहाणेच्या जागी मुंबईचे कर्णधारपद सांभाळण्याचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत.





