Vijay Hazare Trophy 2024/25 | ‘देवा, मला आणखी काय पहायचे आहे?’ मुंबई संघातून वगळल्यानं हताश ‘पृथ्वी शॉ’नं व्यक्त केल्या भावना…

Vijay Hazare Trophy 2024-25 (Prithvi Shaw) : पृथ्वी शॉ सध्या आपल्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. खराब फॉर्ममुळे, आयपीएल 2025 साठी आयोजित मेगा लिलावातही शॉला कोणीही खरेदी केले नाही. शॉ केवळ त्याच्या खराब फॉर्ममुळेच चर्चेत नाही तर काही काळापासून त्याच्या शिस्तीवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी मुंबई संघात स्थान न मिळाल्याने हताश झालेल्या ‘पृथ्वी शॉ’ ने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनने विजय हजारे ट्रॉफी 2024-25 साठी संघाची घोषणा केली आहे. स्टार फलंदाज पृथ्वी शॉला संघात स्थान मिळाले नाही. नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये शॉची कामगिरी काही खास नव्हती. अशा परिस्थितीत आता एकदिवसीय सामन्याची स्पर्धा म्हणजेच विजय हजारे ट्रॉफीसाठी झालेल्या संघ निवडीसाठी त्याचा विचार करण्यात आलेला नाही.
हताश पृथ्वीने मांडली व्यथा….
संघात स्थान न मिळाल्यानंतर, शॉने इंस्टाग्रामद्वारे एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये त्याने लिस्ट-ए सामने हायलाइट केले. भारतीय फलंदाजाने विचारले, “देवा, मला आणखी काय पहायचे आहे?” पुढे त्यानं लिस्ट-ए सामन्यांच्या आकडेवारीबद्दल लिहले आहे तसेच आपण नक्कीच पुनरागमन करणार असल्याचेही शॉने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
Instagram story of Prithvi Shaw.
– Shaw has been dropped from the Mumbai squad for the Vijay Hazare Trophy after having such remarkable stats in List A 🙇 pic.twitter.com/mGoykOwuon
— Johns. (@CricCrazyJohns) December 17, 2024
इंस्टा स्टोरीवर शॉ याने लिहिले की, “देवा, मला सांग, मला आणखी काय पहायचे आहे. जर मी 65 डावात 55.7 च्या सरासरीने आणि 126 च्या स्ट्राइक रेटने 3399 धावा केल्या असतील तर मी तितका चांगला नाही. पण माझा तुमच्यावर कायम विश्वास ठेवेल आणि आशा आहे की लोक अजूनही माझ्यावर विश्वास ठेवतील, कारण मी नक्कीच पुनरागमन करेल, ओम साई राम.”
विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघ – श्रेयस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, जय बिस्टा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेड्गे, सिद्धेश लाड, हार्दिक तामोरे, प्रसाद पवार, अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियान, शार्दुल ठाकुर, रॉयस्टन डियास, जुनैद खान, हर्ष तन्ना आणि विनायक भोईर.





