WPL 2024 ( #MIvRCB #Eliminator ) | मुंबई-बंगळुरु आज आमने-सामने, लढतीतील विजेता संघ…

Women’s Premier League 2024 Eliminator Match : – महिला प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत आज (शुक्रवार) दोन बलाढ्य संघ एकमेकांशी लढणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स व स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बंगळुरु हे दोन संघ आज एलिमिनेटर सामन्यात आमने-सामने येत आहेत. या लढतीतील विजेता संघ येत्या रविवारी दिल्ली कॅपिटल्सशी अंतिम लढत खेळेल.
मुंबई व बंगळुरुने यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. मात्र, त्यांना अव्वल स्थान मिळवण्यात यश आले नाही. दिल्ली कॅपिटल्सने मात्र, सर्वाधिक १२ गुणांसह अव्वल स्थान मिळवताना थेट अंतिम लढतीसाठी पात्रता मिळवली. दिल्ली संघाने ८ सामने खेळताना ६ सामने जिंकले तर २ सामने गमावले. दुसर्या क्रमांकावरील मुंबई संघाने ८ सामने खेळताना ५ सामने जिंकले तर तीन सामने गमावले होते.
Mark your Calendars! 🗓️
It’s the Mumbai Indians who will take on the Royal Challengers Bangalore in the #TATAWPL Eliminator 🥳#MIvRCB | #Eliminator | @mipaltan | @RCBTweets pic.twitter.com/q92MLJvuaD
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 13, 2024
बंगळुरुनेही ८ सामन्यांतून ४ विजय मिळवले तर ४ पराभव पत्करले आहेत. यंदाच्या मोसमात गतविजेत्या मुंबई संघाला थेट अंतिम फेरीत पात्र होता आले नाही. त्यामुळेच त्यांना आता एलिमिनेटरची लढत खेळावी लागणार आहे. स्पर्धेतील अन्य दोन संघ युपी वॉरिअर्स व गुजरात जायंट्सची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नाही व त्यामुळे यंदाच्या स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपूष्टात आले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ranji-trophy-2024-prize-money-money-rains-on-champion-mumbai-know-how-much-prize-money-was-received/
एलिमिनेटरच्या लढतीत खेळणार असलेले मंबई व बंगळुरु हे दोन्ही संघ समतोल आहेत. मानधनाच्या तोडीस तोड कामगिरी हरमनप्रीतनेही केली आहे. दोघींचेही नेतृत्व सरस ठरले आहे. मात्र, आता या एलिमिनेटर लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता वाढली आहे.





