WPL 2024 ( #GGvUPW Match 18 ) : गुजरातने दिल्लीविरुद्ध टाॅस जिंकला, कर्णधार मुनीने घेतला ‘हा’ निर्णय…

WPL Live Cricket Score, GG vs UPW Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीगच्या पाच संघांमधील प्लेऑफची लढत सुरू झाली आहे. मुंबई आणि दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचले असून, आता लढत तिसऱ्या स्थानासाठी आहे. आरसीबी, यूपी आणि गुजरात यांच्यात स्पर्धा आहे.
महिला प्रीमियर लीग 2024 चा 18 वा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला जात आहे.
गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सांगितले की त्यांचा संघ एका बदलासह यूपीविरुद्ध मैदानात उतरेल. आता गेल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्यात गुजरातला यश येते की पुन्हा एकदा निराशेला सामोरे जावे लागणार हे सामना झाल्यानंतरच कळेल.
🚨 Toss 🚨@Giant_Cricket win the toss and elect to bat against @UPWarriorz
Live 📱💻 https://t.co/WHTYqs2Bd5#TATAWPL | #GGvUPW pic.twitter.com/jmymfcfiJr
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 11, 2024
दरम्यान, आज या लीगचा 18वा सामना जर यूपीने हा जिंकला तर ते आठ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचतील. मात्र, आरसीबीचा नेट रन रेट यूपीपेक्षा चांगला आहे. जर संघाने पुढील सामना जिंकला तर ते यूपीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढू शकतात. अशा स्थितीत यूपीला आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल, त्यामुळे त्यांचा नेट रनरेट सुधारू शकतो.





