WPL 2024 ( #GGvRCB Match 13 ) : गुजरातचा आरसीबीविरुद्ध फलंदाजीचा निर्णय,‘अशी’ आहे दोन्ही संघांची प्लेइंग 11…

WPL Live Cricket Score, GG vs RCB Women’s Premier League 2024 : आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा 13 वा सामना रंगणार आहे.
गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ( Gujarat Giants elect to bat first against Royal Challengers Bangalore ) या मैदानावर काल संध्याकाळी दिल्लीने मुंबईसमोर प्रथम फलंदाजी करत 193 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्लीने हा सामना जिंकला होता. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणारा गुजरात आरसीबीसमोर सन्मानजनक लक्ष्य ठेवण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.
GG vs RCB : दोन्ही संघाची प्लेईंग 11 खालीलप्रमाणे –
गुजरात जायंट्स : बेथ मुनी (विकेटकीपर/कर्णधार), लॉरा वोल्वार्ड, फोबी लिचफिल्ड, वेदा कृष्णमूर्ती, दयालन हेमलता, ऍशले गार्डनर, कॅथरीन ब्राइस, तनुजा कंवर, मेघना सिंग, मन्नत कश्यप, शबनम एमडी शकील.
The lineups are here 👊
A look at the Playing XIs of the two sides for tonight 👌👌
Live 💻📱https://t.co/W8mqrR94WB#TATAWPL | #GGvRCB pic.twitter.com/h8AJf9vCJz
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 6, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : सबिनेनी मेघना, स्मृती मानधना (कर्णधार), एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी डिव्हाईन, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, एकता बिश्त, सिमरन बहादूर, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
दरम्यान, या स्पर्धेत गुजरातची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांत संघाला एकही विजय मिळालेला नाही. गुणतालिकेत शून्य गुणांसह संघ शेवटच्या स्थानावर आहे. आता गुजरात आज विजयाचे खाते उघडण्यात यशस्वी होतो की नाही हे पाहावे लागेल.





