RCB enters playoffs : आरसीबीचा विजयी ‘पंच’! गुजरातला लोळवत प्लेऑफमध्ये एन्ट्री मारणारा ठरला पहिलाच संघ

RCB enters playoffs in WPL 2026 : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने आपला धडाका कायम राखला आहे. सोमवारी झालेल्या अटीतटीच्या लढतीत आरसीबीने गुजरात जायंट्सचा (GG) ६१ धावांनी धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह आरसीबीने सलग पाचवा विजय नोंदवत प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा आरसीबी हा पहिला संघ ठरला आहे.
Emphatic and 𝙥𝙡𝙖𝙮𝙤𝙛𝙛𝙨 𝙗𝙤𝙪𝙣𝙙! ❤️
Congratulations to 2⃣0⃣2⃣4⃣ #TATAWPL champions @RCBTweets on becoming the first team to reach the playoffs 👏🔝#KhelEmotionKa | #GGvRCB pic.twitter.com/QOH99joDQ5
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 19, 2026
गौतमी नाईकची वादळी फलंदाजी –
A performance to cherish! 🫡
Gautami Naik’s maiden #TATAWPL half-century earns her the Player of the Match award 👏
Relive her knock ▶️ https://t.co/9imfNMhkI5 #KhelEmotionKa | #GGvRCB pic.twitter.com/aDBx1NG3zs
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 19, 2026
टॉस गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या ९ धावांवर ग्रेस हॅरिस आणि जॉर्जिया वोल बाद झाल्या. मात्र, त्यानंतर गौतमी नाईकने डावाची सूत्रे हाती घेतली. गौतमीने ५५ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ७३ धावांची झुंजार खेळी केली. तिला कर्णधार स्मृती मानधना (२६) आणि ऋचा घोष (२७) यांनी मोलाची साथ दिली. अखेरच्या षटकांत राधा यादवने ८ चेंडूत १७ धावा कुटल्यामुळे आरसीबीने २० षटकांत १७८ धावांचा डोंगर उभा केला.
गुजरातचा डाव पत्त्यासारखा कोसळला –
प्रत्युत्तरात १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सची अवस्था अत्यंत बिकट झाली. आरसीबीच्या सायली सातघरेने दुसऱ्याच षटकात बेथ मूनी आणि सोफी डिव्हाईनला बाद करून गुजरातचे कंबरडे मोडले. गुजरातने अवघ्या ५६ धावांत आपले ६ फलंदाज गमावले होते. कर्णधार ॲशले गार्डनरने ४३ चेंडूत ५३ धावा करत एकाकी झुंज दिली, पण दुसऱ्या बाजूने तिला साथ मिळाली नाही. गुजरातचा डाव २० षटकांत ८ बाद ११७ धावांवर आटोपला.
पॉइंट्स टेबलमध्ये आरसीबी अव्वल –
𝗪 𝗪 𝗪 𝗪 𝗪!@RCBTweets make it 5⃣ victories in a row to book a playoffs spot! 👏🙌
Scorecard ▶️ https://t.co/KAjH514Egw #TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvRCB pic.twitter.com/tTUds8L5tP
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 19, 2026
या विजयासह आरसीबी १० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे. गेल्या हंगामात प्लेऑफ गाठण्यात अपयशी ठरलेल्या आरसीबीने यावर्षी जबरदस्त पुनरागमन केले आहे. दुसरीकडे, ५ सामन्यांत तिसऱ्या पराभवासह गुजरातचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे.





