व्वा रे पठ्ठ्या ! नीरज चोप्राने करून दाखवलचं; भालाफेकीत अखेर ९० मीटरचे अंतर गाठलं

Neeraj Chopra | भालाफेकपटू नीरज चोप्राने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. शुक्रवारी दोहा डायमंड लीग स्पर्धेत त्याने तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर भाला फेकत विक्रमाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे त्याला आतापर्यंत 90 मीटरचा टप्पा पार करता आला नव्हता. हा विक्रम आता त्याने मोडीत काढत इतिहास रचला आहे.
नीरज चोप्रानं पहिल्या प्रयत्नात 88.44 मीटर भाला फेकला. तर, दुसऱ्या प्रयत्नात तो अपयशी ठरला, त्याचा प्रयत्न बाद ठरला. नीरज चोप्रानं तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रानं त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा 90 मीटरचा टप्पा पार केला आहे.
नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर
नीरज चोप्रानं चौथ्या प्रयत्नात 80.56 मीटर भाला फेकला. तो चौथ्या प्रयत्नापर्यंत पहिल्या स्थानावर होता. तर जुलियन वेबर 89.06 मीटरच्या भालाफेकीसह दुसऱ्या स्थानावर होता. जुलियन वेबरनं पाचव्या प्रयत्नात 91 मीटरपेक्षा अधिक अंतरावर भाला फेकला. ज्युलियन वेबरने त्याच्या शेवटच्या प्रयत्नात 91.06 मीटर लांब भालाफेक करून अव्वल स्थान पटकावले. यामुळे नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर पोहचला.
नीरज चोप्राची सर्वोत्कृष्ट कामगिरी यापूर्वी 89.94 मीटर होती. त्यानं ही कामगिरी 2022 मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये केला होता. नीरज चोप्रानं 2018 मध्ये दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग घेतला होता, त्यावेळी तो चौथ्या स्थानावर राहिला होता. 2023 मध्ये तो पहिल्या स्थानावर होता तर 2024 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला होता.
The 90m Throw by Neeraj Chopra | Historicpic.twitter.com/LI2aqdUZYr
— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) May 16, 2025
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पटकावले होते सुवर्णपदक
नीरज चोप्रानं 2020 मध्ये टो कियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. भालाफेकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. आता नीरज चोप्रा हा 90 मीटर भाला फेकणारा तिसरा आशियाई खेळाडू ठरला आहे. भालाफेक स्पर्धेत 98.48 मीटरच्या सर्वात लांब फेकीचा विक्रम जान झेलेझनी यांच्या नावावर आहे. नीरजच्या आधी आशियाई खेळाडूंमध्ये दोघांनी 90 मीटरपेक्षा जास्त फेक केली आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीम व्यतिरिक्त तैवानच्या चेंग चाओ सननेही ही कामगिरी केली आहे.
90 मीटरपेक्षा लांब भालाफेक करणाऱ्या 25 जणांच्या यादीत गोल्डन बॉयच्या नावाचा समावेश
आता या यादीत भारताच्या नीरज चोप्राचे नाव जोडले गेले आहे. तर जगात ९० मीटरपेक्षा लांब भालाफेक करणाऱ्या २५ भालाफेकपटूंपैकी सहा जर्मनीचे, चार फिनलँडचे, दोन चेक प्रजासत्ताकचे, ग्रेनाडा, पाकिस्तान, केनिया, रशिया, ग्रीस, नॉर्वे, ग्रेट ब्रिटन, चायनीज ताइपेई, अमेरिका, लाटविया, एस्टोनिया आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोचे प्रत्येकी १-१ भालाफेकपटू आहेत, तर नीरज चोप्रा भारतातील एकमेव आहे.
नीरज चोप्राची सर्वोत्कृष्ट कामगिरी यापूर्वी 89.94 मीटर होती. त्यानं ही कामगिरी 2022 मध्ये स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये केला होता. नीरज चोप्रानं 2018 मध्ये दोहा डायमंड लीगमध्ये सहभाग घेतला होता, त्यावेळी तो चौथ्या स्थानावर राहिला होता. 2023 मध्ये तो पहिल्या स्थानावर होता तर 2024 मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला होता.
दुखापतीनंतरही नीरजने पॅरिस ऑलिंपिकमध्ये भाग घेतला. पण आता नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत भारताचे नाव उंचावले आहे.
हेही वाचा:
Pune : धर्मादाय रुग्णालयांची सेवा सर्वसामान्यांपर्यंत मिळावी





