Sachin Yadav : कोण आहे सचिन यादव? ज्याने नीरज चोप्रा आणि अरशद नदीमला मागे टाकत पटकावलं चौथं स्थान

Who is Sachin Yadav : वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत भारताच्या सचिन यादव यांनी भालाफेक स्पर्धेत चौथे स्थान पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 86.27 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करत ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम यांना मागे टाकले. जरी सचिनला पदक मिळाले नसले, तरी त्यांच्या या कामगिरीने त्यांना भारताचा नवा ‘बाहुबली’ म्हणून ओळख मिळवून दिली आहे.
सचिन यादव यांची कामगिरी –
सचिन यादवचा हा थ्रो त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीतील सर्वोत्तम (पर्सनल बेस्ट) आहे, परंतु पदक न मिळाल्याने त्याची काहीशी निराशा झाली असेल. त्याने अंतिम फेरीत पहिल्याच प्रयत्नात 86.27 मीटरचा थ्रो करत दमदार सुरुवात केली. त्याचा दुसरा थ्रो फाऊल ठरला, तर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी 85.71 मीटर आणि चौथ्या प्रयत्नात 84.90 मीटरचा थ्रो केला. पाचव्या प्रयत्नात त्यांनी 85.96 मीटर अंतर कापले, तर शेवटचा थ्रो 80.95 मीटरचा होता.
Amazing performance #SachinYadav pic.twitter.com/sU3yFcaHJI
— Rahul Trehan (@imrahultrehan) September 18, 2025
कोण आहेत सचिन यादव?
#SachinYadav ने #WorldAthleticsChampionships 2025 में 86.27 मीटर के अपने व्यक्तिगत सर्वश्रेष्ठ प्रदर्शन के साथ चमक बिखेरी
विश्व चैंपियन #NeerajChopra अपने पहले पाँच प्रयासों के बाद पुरुषों की भाला फेंक स्पर्धा के फ़ाइनल से बाहर होकर आठवें स्थान पर रहे। pic.twitter.com/XDy2D9E5kI
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) September 18, 2025
उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील रहिवासी असलेला सचिन यादव सध्या उत्तर प्रदेश पोलिसांत कार्यरत आहेत. यंदाच्या आशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने रौप्यपदक पटकावले होते. याआधी, 73व्या ऑल इंडिया पोलिस अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 84.21 मीटरचा थ्रो करत त्याने 30 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला होता. हा रेकॉर्ड यापूर्वी सतबीर सिंग यांच्या नावावर होता, ज्यांनी 1994 मध्ये 79.88 मीटरचा थ्रो केला होता. आता वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सचिनने आपलाच वैयक्तिक रेकॉर्ड मोडला आहे. सचिनचे ध्येय नीरज चोप्राप्रमाणे 90 मीटरचा टप्पा गाठण्याचे आहे.
हेही वाचा – Mohsin Naqvi : दिवसभराच्या ड्राम्यानंतर पाकिस्तान का मागे हटला? नक्वींनी सांगितले बहिष्कार न टाकण्याचे कारण!
नीरज चोप्रा राहिला आठव्या स्थानावर –
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यंदा अंतिम फेरीत आठव्या स्थानावर राहिला. त्याचा सर्वोत्तम थ्रो 84.03 मीटरचा होता. पहिल्या प्रयत्नात त्याने 83.65 मीटर, दुसऱ्या प्रयत्नात 84.03 मीटर, तर चौथ्या प्रयत्नात 82.86 मीटरचा थ्रो केला. तिसऱ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याचा थ्रो फाऊल ठरला, ज्यामुळे तो पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. पाकिस्तानचा अरशद नदीमने चार थ्रो केले. त्याचा पहिला थ्रो 82.73 मीटर, दुसरा 82.75 मीटर, तर उर्वरित दोन प्रयत्न फाऊल ठरले.
हेही वाचा – IND vs PAK : पाकिस्तानचा दावा खोटा; अँडी पायक्रॉफ्टने माफी मागितली नाही, मग बंद खोलीत काय घडलं? जाणून घ्या
वॉलकॉट ठरला विजेता –
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या वॉलकॉटने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने ८८.१६ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. ग्रेनाडाच्या पीटर्सने ८७.३८ मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले. अमेरिकेच्या कर्टिस थॉम्पसनने ८६.६७ मीटर भालाफेक करून कांस्यपदक जिंकले.





