Neeraj Chopra : नीरज चोप्राला मानद लेफ्टनंट कर्नल पदवी: देशाचा गौरव वाढवणारा क्षण!

सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर नीरज चोपडाने आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले, “हा सन्मान माझ्यासाठी केवळ सन्मानच नाही, तर देशाप्रती एक जबाबदारी आहे. मला मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवी प्रदान केल्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि टेरिटोरियल आर्मीचे आभार. ही वर्दी परिधान करताना मला अभिमान वाटतो. जय हिंद.”
राजनाथ सिंह यांनी केले नीरज चोप्राचे कौतुक –
Congratulations to our Javelin star Neeraj Chopra on being conferred the honorary rank of Lieutenant Colonel by the Indian Army! 🇮🇳🪖✨
A true symbol of excellence, discipline, and national pride, both on and off the field! 👏Way to go, NC❤️🤝#NeerajChopra #Athletics… pic.twitter.com/v95qScmeYO
— SAI Media (@Media_SAI) October 22, 2025
या समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नीरज चोप्राचे कौतुक करताना म्हटले, “नीरज चोप्रा हे दृढनिश्चय, देशभक्ती आणि उत्कृष्टतेच्या भारतीय भावनेचे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या अनुशासित आणि समर्पित वृत्तीने केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्रोत बनण्याचे कार्य केले आहे. त्यांनी मैदानात दाखवलेला अनुशासन आणि निष्ठा यामुळे ते सेनेच्या आदर्शांशी जोडले गेले आहेत. ते येणाऱ्या पिढ्यांसाठी खरे प्रेरणास्रोत आहेत.”
हेही वाचा – IND A vs SA A : सर्फराझ खानला भारत अ संघातून वगळलं, अश्विनचा निवडकर्त्यांवर संताप!
नीरज चोप्राला २०१६ मध्ये भारतीय सेनेच्या राजपूताना रायफल्स रेजिमेंटमध्ये सामील करण्यात आले होते. हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील खांद्रा गावात २४ डिसेंबर १९९७ रोजी जन्मलेल्या नीरजने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने भारत आणि भारतीय सेनेचा गौरव वाढवला आहे. टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये त्याने इतिहास रचत ट्रॅक अँड फील्ड प्रकारात भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये त्याने रौप्यपदक पटकावले. २०२३ मध्ये वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकून त्याने देशाचे नाव उज्ज्वल केले.
हेही वाचा – IND vs AUS : फलंदाज की गोलंदाज, अॅडलेडमध्ये कोणाचे वर्चस्व, दुसऱ्या सामन्यात खेळपट्टी आणि हवामान कसे असेल?
नीरजच्या या अप्रतिम यशस्वी कारकिर्दीला आणि राष्ट्रसेवेतील योगदानाला सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १६ एप्रिल २०२५ रोजी त्यांना टेरिटोरियल आर्मीत मानद कमीशन प्रदान केले होते. नीरजला यापूर्वी पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, परम विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक यांसारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.





