Rupali Bhosale : चेहऱ्यावर, हातावर जखमा…; रुपाली भोसलेचा लुक पाहून चाहतेही झाले थक्क
Rupali Bhosale : रुपाली भोसले साकारते दोन अगदी विरुद्ध स्वभावाच्या भूमिका

Rupali Bhosale : मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसलेचा नवा लुक समोर आला आहे. सध्या ती ‘लपंडाव’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. यातील व्हायरल व्हिडिओमध्ये रूपालीच्या चेहऱ्यावर, हातावर जखमा दिसत आहेत. (Rupali Bhosale)
यातील प्रसंग खरा वाटावा यासाठी मालिकेच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. रूपालीच्या चेहऱ्यावर आणि हातावर असलेल्या जखमांच्या खुणा या मेकअपने खऱ्यासारख्या तयार केल्या आहेत. इतकेच काय तर हा मेकअप करण्यासाठी जेवढा वेळ लागला नाही तेवढा तो काढण्यासाठी लागत असल्याचं रूपालीने प्रेक्षकांना सांगितलं. (Rupali Bhosale)
‘लपंडाव’ मालिकेत सध्या एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत असून, नुकत्याच प्रसारित झालेल्या भीषण अपघाताच्या प्रसंगानं प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवलं आहे. हा थरारक प्रसंग चित्रित करण्यामागे अभिनेत्री रुपाली भोसले आणि संपूर्ण मेकअप टीमनी प्रचंड मेहनत घेतली आहे. (Rupali Bhosale)
View this post on Instagram
दरम्यान, या मालिकेत रुपाली भोसले आपल्याला दुहेरी भूमिकेत पाहायला मिळत आहे. ती एका बाजूला नकारात्मक छटा असलेली मनस्विनी आणि दुसऱ्या बाजूला ‘तेजस्विनी’ अशा दोन अगदी विरुद्ध स्वभावाच्या भूमिका साकारत आहे. यातील एकाअपघाताच्या प्रसंगासाठी रुपालीचा विशेष मेकअप करण्यात आला आहे.
दोन लूक करण्याबाबत रुपाली म्हणाली, ‘दोन्ही व्यक्तिरेखांचा गेटअप करण्यासाठी खूप वेळ लागतो. विशिष्ट प्रसंगासाठी तर आणखी मेहनत घ्यावी लागते. सरकार आणि तेजस्विनी असे दोन लूक करावे लागतात. जितका वेळ तयार व्हायला लागतो, तितकाच वेळ मेकअप काढण्यासाठीही लागतो. (Rupali Bhosale)
आमची मेकअप टीम प्रत्येक गोष्टीवर अतिशय बारकाईनं काम करते. कधी कधी खूप धावपळ होते, पण प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होतो, तेव्हा सगळी मेहनत सार्थकी लागल्यासारखं वाटतं. त्यामुळे आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळते,’ असे म्हणत रुपालीने तिच्या टीमचेही कौतुक केले आहे. (Rupali Bhosale)
हेही वाचा:





