मंचर -आंबेगाव तालुक्यात नव्याने 23 करोनाबाधित रुग्ण सापडले. घोडेगाव येथे 7, कळंब 4, महाळुंगे पडवळ, काठापूर येथे प्रत्येकी 2, मंचर, गावडेवाडी, निरगुडसर, मेंगडेवाडी, अवसरी खुर्द, पिंपळगांव घोडे, शिंगवे, अवसरी बुद्रुक येथे प्रत्येकी एक रुग्ण करोनाबाधित सापडले आहेत. तालुक्यात एकूण रुग्णसंख्या 15 हजार 40 झाली असून 14 हजार 427 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकुण 337 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 276 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.