Worli Hit and Run Case: मिहिर शाहला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Worli Hit and Run Case – मुंबई येथील न्यायालयाने मंगळवारी बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहिर शाह याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. शाह याला ९ जुलै रोजी अटक करण्यात आली.
त्याच्या दोन दिवसांआधी त्याच्या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती, ज्यात कावेरी नाखवा (४५) या महिलेचा मृत्यू झाला आणि तिचे पती प्रदीप नाखवा हे जखमी झाले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपीला मंगळवारी कोठडी संपल्यानंतर मुख्य महानगर दंडाधिकारी (शिवडी न्यायालय) एस. पी. भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले.
आरोपीने पळून जात असताना त्याला आश्रय देणाऱ्या व्यक्तींची माहिती दिली नसल्याचे सांगत पोलिसांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. त्यांनी अद्याप गहाळ नंबर प्लेटबाबत माहिती दिलेली नाही, असे सरकारी वकील रवींद्र पाटील आणि भारती भोसले यांनी न्यायालयाला सांगितले.
तपास सुरू असून गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन कोठडी वाढवण्यात यावी, असे फिर्यादीने म्हटले आहे. आयुष पासबोला आणि शुदिर भारद्वाज या वकिलांनी शहा याची बाजू मांडताना रिमांडला विरोध करत सांगितले की पोलिसांनी आरोपींकडून जे काही गरजेचे आहे ते जप्त केले आहे.
पोलिसांनी 27 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत आणि तो फरार असताना सर्व आरोपींनी कोणाशी संपर्क साधला हे शोधण्यासाठी तपासकर्त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला होता,दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.
या भीषण अपघातानंतर सत्ताधारी शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर पळून गेला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजेश शाहने आपल्या मुलाच्या सुटकेसाठी सक्रिय सहभाग घेतला आणि अपघातातील वाहन पळवून नेण्याची त्यांची योजना होती.
या प्रकरणातील आरोपी राजेश शहा यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांचा ड्रायव्हर राजऋषी बिदावत तो देखील न्यायालयीन कोठडीत आहे.





