Mohammad Nabi Retirement : अफगाणिस्तान क्रिकेट संघाला मोठ्या उंचीवर नेण्यात मोलाचे योगदान देणारे नाव म्हणजे मोहम्मद नबी. आता त्यानं घोषणा केली आहे की, “तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.” अफगाणिस्तानने अलीकडेच तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बांगलादेशचा 2-1 असा पराभव केला. मालिकेतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानविरूध्द 5 विकेटने विजय मिळवल्यानंतर, नबीने सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात (Match Presentation) निवृत्तीची पुष्टी करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
मोहम्मद नबीने या मालिकेत फलंदाजीमध्ये 135 धावा केल्या, जिथे त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 होती. याशिवाय त्याने गोलंदाजीतही दोन विकेट घेतल्या, या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर खेळाडू म्हणून निवडण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना मोहम्मद नबी म्हणाला का, “गेल्या विश्वचषकानंतर मी निवृत्तीचा निर्णय घेतला होता, पण त्यानंतर आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरलो. मला वाटले की, मी या स्पर्धेत खेळू शकतो.”
“In my mind, from the last World Cup, I was retired but then we qualified for the Champions Trophy and I felt if I could play that, it would be great” – Afghanistan’s highest capped ODI cricketer, Mohammad Nabi
Full story: https://t.co/U1jFv7oX4u pic.twitter.com/XUXDGxKUhJ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 12, 2024
जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू
मोहम्मद नबी 2009 पासून अफगाणिस्तानकडून खेळत आहे. त्याच्या जवळपास दीड दशकाच्या कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. या काळात त्याने फलंदाजीत 3,600 धावा आणि गोलंदाजीत 172 विकेट्स घेतल्या आहेत. नबी सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर 1 अष्टपैलू खेळाडू आहे. 2009 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध पदार्पण केल्यापासून बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापर्यंत त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 2 शतके आणि 17 अर्धशतके केली आहेत. वनडे क्रिकेटमधील टॉप-10 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एकही भारतीय नाही.
Border–Gavaskar Trophy 2024-25 : …तर रोहित ऐवजी बुमराह असेल कर्णधार – प्रशिक्षक गंभीर
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये किती संघ आहेत?
आयसीसीने शेवटचे 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये पाकिस्तानने ऐतिहासिक विजय नोंदवला होता. आता ही स्पर्धा आठ वर्षांनंतर परतणार आहे, जी पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. यासाठी, ते 8 संघ पात्र ठरले आहेत, जे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या गुणतालिकेत पहिल्या आठ स्थानांवर होते. त्या विश्वचषकात अफगाणिस्तान सहाव्या स्थानावर राहून थेट चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरला होता. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही.