Mohammad Nabi : ‘माझा काय संबंध?’, मुस्तफिझूरबद्दल प्रश्न विचारताच मोहम्मद नबी बांगलादेशी पत्रकारावर संतापला

Mohammad Nabi angry on Bangladesh reporter : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान आणि आयपीएल २०२६ मधील त्याच्या हकालपट्टीवरून सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला संघातून वगळल्यानंतर बांगलादेशातून भारताविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या वादात अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी याने उडी घेत बांगलादेशी पत्रकाराला चांगलेच सुनावले आहे.
पत्रकाराचा प्रश्न आणि नबीचा संताप –
बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) मधील ‘नोआखली एक्सप्रेस’ आणि ‘ढाका कॅपिटल्स’ यांच्यातील सामन्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी एका बांगलादेशी पत्रकाराने नबीला मुस्तफिजूरच्या आयपीएल वादावर प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच नबी चिडला आणि म्हणाला, “भाई, या घटनेचा माझ्याशी काय संबंध? मुस्तफिजूरशी माझा काय संबंध? मला राजकारणाशी देणेघेणे नाही. तो एक चांगला गोलंदाज आहे इतकंच मला माहित आहे, पण मला कोणत्याही राजकीय चर्चेचा भाग बनायचे नाही.”
Respect for Nabi & Afghanistan +9999 📈
Afghan cricketer Md. Nabi, who is currently playing in the Bangladesh Premier League (BPL), was asked about Mustafizur Rahman being released from the IPL.
Nabi got angry and refused to comment on the matter. 😡🤬🇮🇳 🩷 🇦🇫 pic.twitter.com/FoRFkPwpMy
— Jara (@JARA_Memer) January 12, 2026
टी-२० वर्ल्ड कप भारतातून हलवण्याची मागणी –
मुस्तफिजूरला वगळल्यानंतर बांगलादेश सरकारने देशात आयपीएलचे प्रसारण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे, तर टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील बांगलादेशचे सामने भारतातून श्रीलंकेत हलवावेत, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) लावून धरली आहे. मात्र, आयसीसीने (ICC) आतापर्यंत ही मागणी फेटाळून लावली आहे. बीसीबीने या संदर्भात दुसरे अधिकृत पत्र पाठवले असून अद्याप आयसीसीच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
अनिश्चिततेच्या सावटात बांगलादेशचा संघ जाहीर –
इतका मोठा वाद सुरू असतानाही बांगलादेशने विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला आहे. बांगलादेशचा पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. बांगलादेशचा समावेश इंग्लंड, इटली आणि नेपाळसोबत ‘ग्रुप सी’ मध्ये करण्यात आला आहे.





