हा आहे चंद्रपूरचा देवांशु शिंगरू!जन्मापासूनच दिव्यांग असलेल्या देवांशुला वादनामध्ये रुची होती.लोखंडी दरवाज्यावर तो काही ना काही वाजवत राहायचा…, आपला मुलगा दिव्यांग आहे मात्र त्याला वादनात विशेष गती असल्याचे त्याच्या आईने ओळखले.
आपल्या मुलगा वादनामध्ये रमतो, त्याला यामध्ये रुची आहे आणि गतीही, गरज आहे ती योग्य दिशेची या विचारातून देवांशुच्या आईने त्याच्यासाठी उत्तम संगीत शिक्षणाची शोधाशोध सुरु केली-अखेर त्यांचा हा शोध पुण्यातील बालकल्याण संस्था येथे येऊन थांबला.
येथे देवांशुला दत्तात्रय भावे हे संगीत शिक्षक लाभले आणि संगीत क्षेत्रातील त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली…,आज जागतिक दिव्यांगदिनी-ऐकूयात देवांशुची प्रेरणादायी कहाणी…