अक्कलकोटमधील महाप्रसादगृहाचे २१ जुलैला भूमिपूजन
Updated On:

सोलापूर – देशभर नावारूपास आलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने आपल्या सेवाकार्याचा विस्तार करीत सुमारे ६५ कोटी रूपये खर्च करून पाच मजली देखणे महाप्रसादगृह उभारण्याचा संकल्प सोडला आहे.
संपूर्णतः वातानुकूलित असलेल्या या महाप्रसादगृहात एकाचवेळी अडीच हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल. तर पाच हजार भाविकांसाठी आधुनिक सुविधांसह प्रतीक्षालय उभारले जाणार आहे.
अक्कलकोट नगरीच्या सौंदर्यात भर टाकणा-या या नव्या महाप्रसादगृहाचे भूमिपूजन येत्या २१ जुलै रोजी, गुरूपौर्णिमेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिली.





