Worker Death: मस्करी नडली! सणसवाडीत एका अघोरी कृत्यामुळे कामगाराचा करुण अंत
Worker Death: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे धक्कादायक घटना; कॉम्प्रेसरच्या उच्च दाबाची हवा पोटात गेल्याने कामगाराचा मृत्यू.

Worker Death – सणसवाडी (ता. शिरुर) येथील वेस्टर्न फोर्ज प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये कामगार कामगाराच्या अंगावर हवा मारत असताना हवेचा दाब जास्त असलेला पाइप गुद्दद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू झाला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेश सुरेंद्र यादव (वय ४२, सध्या रा. सणसवाडी, मूळ रा. जिनीबिह्गा टनकुप्पा, बिहार), असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
बिकीकुमार भाईलाल सरोज (सध्या रा. सणसवाडी, ता. शिरुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सणसवाडी येथील वेस्टर्न कंपनीमध्ये (दि.१) रोजी कामगार काम करत असताना चहा पिण्यासाठी झालेल्या सुट्टीदरम्यान कामगार त्यांच्या अंगावरील धूळ कॉम्प्रेसरच्या उच्च दाबाच्या हवेच्या पाइपने झटकत असताना नरेश यादव याने बिकीकुमार सरोज याला त्याच्या अंगावरील धूळ झटकण्यास सांगितले.
दरम्यान हवा मारत असताना नरेश पाठीमागे फिरला असता बिकीकुमार याने त्याच्या हातातील हवेचा पाइप पाठीमागून नरेश यादवच्या गुद्दद्वारामध्ये घातला. यावेळी नरेशच्या पोटात हवा गेल्याने नरेशचे पोट दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरु असताना कामगाराचा मृत्यू झाला. याबाबत संतोषकुमार किशोर यादव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सरोज याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.





