Mrunal Thakur : आता सहन करणार नाही; मृणाल ठाकूरने दिला थेट इशारा, पोस्ट चर्चेत
Mrunal Thakur : यानंतर आता अभिनेत्री मृणाल ठाकूरने आक्रमक पवित्रा घेत डीपफेक कटेंट तयार करणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

Mrunal Thakur : बॅालिवूडमधील अनेक कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ वापरून डीपफेक कंटेंट तयार केला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी अनेक कलाकारांनी आवाज उठवत थेट तक्रार दाखल केली आहे. अशीच घटना अभिनेत्री प्रीती झिंटासोबत घडली होती.
गेल्या काही दिवसांपूर्वी या प्रकरणी अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीची सुनावणी न्यायालयात पार पडली होती. यानंतर आता अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur)आक्रमक पवित्रा घेत डीपफेक कटेंट तयार करणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. (Mrunal Thakur)
यासंदर्भात अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने अशा प्रकारच्या गैरवापराविरोधात कठोर भूमिका घेतली असून भविष्यात तिच्या ओळखीचा गैरवापर झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (Mrunal Thakur)
मृणालने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली ती म्हणाली, “तिची प्रतिमा किंवा आवाज वापरून डीपफेक व्हिडिओ किंवा फोटो तयार करणे आणि ते प्रसारित करणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचे सर्व कंटेंट तात्काळ हटवावे. तसेच असा प्रकार समोर आल्यास कायदेशीर पावले उचलली जातील.” असा थेट इशारा अभिनेत्रीने दिला आहे.

मृणाल ठाकूरची इंन्स्टाग्राम स्टोरी
दरम्यान, मृणाल ठाकूरच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, यावर्षीच्या सुरुवातीला ती सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘दो दीवाने शहर में’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात झळकली होती. मुंबईत राहणाऱ्या दोन तरुणांच्या प्रेम, आत्मविश्वास आणि सामाजिक दबावांशी सुरू असलेल्या संघर्षाची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली होती. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (Mrunal Thakur)
यानंतर मृणाल डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘है जवानी तो इश्क होना है’ या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात दिसली. या चित्रपटात वरुण धवन आणि पूजा हेगडे यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. तसेच, शनील देव दिग्दर्शित ‘डकैत – एक प्रेम कथा’ या अॅक्शन-ड्रामा चित्रपटात मृणालने आदिवी शेषसोबत काम केले आहे. आता तिच्या आगामी चित्रपटाविषयी चाहत्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे. (Mrunal Thakur)
Trump Tariffs: ‘ट्रम्प टॅरिफ’वर अमेरिकेत खळबळ ; 25 राज्यांचा संयुक्त खटला दाखल





