Womens World Cup 2025 : भारताची सेमीफायनलमध्ये धडक! आता ‘या’ बलाढ्य संघांशी होणार टक्कर

सेमीफायनलमधील आव्हान कोणाचे?
साखळी फेरीतील प्रत्येक संघाचा एक सामना बाकी असला, तरी भारतीय संघ आपला अखेरचा सामना जिंकूनही गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला आहे. त्यामुळे पहिल्या सेमीफायनलमध्ये भारतासमोर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाचे आव्हान असेल. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्यातील पराभूत संघ आणि इंग्लंड यांच्यात लढत होईल.
कधी आणि कुठे रंगणार सेमीफायनल?
पहिली सेमीफायनल लढत बुधवारी, 29 ऑक्टोबर 2025 रोजी गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवर खेळवली जाईल. दुसरी सेमीफायनल गुरुवारी, 30 ऑक्टोबर 2025 रोजी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर रंगणार आहे. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी एका बलाढ्य संघाशी होईल, तर पहिल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्यातील पराभूत संघ खेळेल.
हेही वाचा – Team India : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात अन् BCCIची सर्वोच्च न्यायालयात याचिका; नेमकं प्रकरण काय?
भारतीय संघ सेमीफायनलमधील या कठीण आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.





