Women’s T20 World Cup 2024 : पाकनं भारताविरूध्द Toss जिंकला, कर्णधार फातिमानं घेतला ‘हा’ निर्णय…

Women’s T20 World Cup 2024 : महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरचा संघ या सामन्यात पहिला विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी स्पर्धेतील या सामन्यात पाकिस्तानचे दुसऱ्या विजयाचे लक्ष्य असेल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना दुबईत होणार आहे.
या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी, टी-20 विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या कर्णधाराने सांगितले की, आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि स्करेबोर्डवर एक मोठी टोटल लावण्याचा प्रयत्न करू.
T20WC 2024. Pakistan won the toss and elected to bat. https://t.co/RO22EEPmAM #INDvPAK #T20WorldCup #WomenInBlue
— BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2024
महिला टी-20 विश्वचषकात आमनेसामने येण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान या संघांनी स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळला आहे. टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध, तर पाकिस्तानचा सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, पाकिस्तानने श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव करून स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात केली. या संदर्भात, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानला हलक्यात घेऊ नये. स्पर्धेतील पुढील वाटचाल भारतीय संघासाठी अवघड बनली असून आता पुढील सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.
भारत-पाक सामना कधी आणि कुठे बघायचा..
भारत विरुद्ध पाकिस्तान महिला T20 विश्वचषक 2024 सामना भारतात डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवरही तुम्ही हा सामना भारतात टीव्हीवर थेट पाहू शकता.





