Women’s T20 World Cup 2024 (IND vs SL, Score Update) : महिला टी-20 विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात टीम इंडियासमोर आज श्रीलंकेचे आव्हान होते. महिला T20 विश्वचषक 2024 च्या महत्त्वाच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेवर 82 धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या आशा अबाधित ठेवल्या आहेत.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 3 बाद 172 धावा केल्या होत्या. श्रीलंकेसमोर 173 धावांचे लक्ष्य होते, पण चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ 19.5 षटकांत अवघ्या 90 धावांवरच गारद झाला. श्रीलंकेकडून कविष्का दिलहरीने सर्वाधिक 21 धावा केल्या. तर अनुष्का संजीवनीने 22 चेंडूत 20 धावांची खेळी केली.
अमा कांचनाने 22 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले, मात्र याशिवाय इतर 8 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले नाहीत. श्रीलंकेची सर्वात मोठी आशा, कर्णधार चमारी अटापट्टू अवघ्या 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात अरुंधती आणि आशा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. रेणुकाने दोन तर श्रेयंका आणि दीप्ती यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
त्याचबरोबर या विजयानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच भारताचा रनरेट +0.576 झाला आहे. भारतीय संघाचे 3 सामन्यांत 4 गुण झाले आहेत. तर अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे 2 सामन्यांत 4 गुण आहेत.
#TeamIndia post 172/3 in the first innings 🔥🔥
Half-centuries from Captain Harmanpreet Kaur & Vice-Captain Smriti Mandhana! 🫡
43 from Shafali Verma 👌
2nd innings coming up ⏳
📸: ICC
Scorecard ▶️ https://t.co/4CwKjmWL30#T20WorldCup | #INDvSL | #WomenInBlue pic.twitter.com/WJH1mqDGh7
— BCCI Women (@BCCIWomen) October 9, 2024
तत्पूर्वी, या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यानंतर टीम इंडियाने 20 षटकांत 3 गडी गमवाताना 172 धावसंख्येपर्यंत मजल मारली. भारतीय सलामीवीर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी शानदार सुरुवात केली. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी 12.4 षटकात 98 धावा जोडल्या. मात्र, यानंतर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा पाठोपाठ माघारी परतल्या. सलामीवीर स्मृती मानधनाने 38 चेंडूत चार चौकार अन् 1 षटकारासह सर्वाधिक 50 धावांची खेळी केली तर शेफाली वर्माने 40 चेंडूत चार चौकारासह 43 धावांचे योगदान दिले.
यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्सने वेगाने धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्ज 10 चेंडूत 16 धावा करत बाद झाली. दोघींमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी झाली. त्यानंतरही हरमनप्रीतने फटकेबाजी सुरूच ठेवली आणि ऋचा घोष सोबत 22 चेंडूत 44 धावांची नाबाद भागीदारी करत संघाची धावसंख्या निर्धारित षटकातं 172 पर्यंत नेली. भारताकडून यादरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौरने तुफानी खेळी केली. भारतीय कर्णधाराने 27 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. तिने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावले. त्याचवेळी ऋचा घोष 6 चेंडूत 6 धावा केल्यानंतर नाबाद राहिली, पण तिने आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली.
श्रीलंकेकडून चमारी अटापट्टू आणि आना कांचना यांनी 1-1 बळी घेतला. यासाठी चमारीनं 4 षटकात 34 तर कांचना हिने 3 षटकात 29 धावा खर्च केल्या. मात्र याशिवाय इतर गोलंदाजांना यश मिळाले नाही. उदेशिका प्रबोधनी महागडी गोलंदाज ठरली तिने 3 षटकात 32 धावा दिल्या.