Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियाला मिळणार पहिला विजय! पाकनं दिलं माफक धावांचे लक्ष्य…

Women’s T20 World Cup 2024 (IND W vs PAK W Live) : महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी खेळवला जात आहे. हरमनप्रीत कौरचा संघ या सामन्यात पहिला विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी स्पर्धेतील या सामन्यात पाकिस्तानचे दुसऱ्या विजयाचे लक्ष्य असेल.
महिला टी-20 विश्वचषकात आमनेसामने येण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान या संघांनी स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळला आहे. टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध, तर पाकिस्तानचा सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, पाकिस्तानने श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव करून स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात केली आहे.
टी-20 विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 105 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे भारतासमोर 106 धावांचे लक्ष्य आहे.
Innings Break!
A fabulous bowling display from #TeamIndia 🙌
🎯 – 1⃣0⃣6⃣
Over to our batters 💪
📸: ICC
Scorecard ▶️ https://t.co/eqdkvWVK4h#T20WorldCup | #INDvPAK | #WomenInBlue pic.twitter.com/fCrNt9ID8n
— BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2024
पाकिस्तान संघाकडून निदा दारने सर्वाधिक धावा केल्या. तिच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांची वैयक्तिक धावसंख्या गाठता आली नाही. पाकिस्तानकडून निदा दारने 34 चेंडूत सर्वाधिक 28 धावा केल्या. सलामीवीर मुनिबा अलीने 26 चेंडूत 17 धावांचे तर फातिमा सनाने 8 चेंडूत 13 योगदान दिले. सईदाने नाबाद 14 आणि नशराने नाबाद 6 धावा केल्या. गुल फिरोजा आणि तुबा हसन यांना खातेही उघडता आले नाही.
या डावात पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली. भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून राहण्याची संधी दिली नाही. भारताकडून अरूधति रेड्डीने सर्वाधिक 3 बळी तर श्रेयंका पाटीलने 2 बळी घेतले. रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान टी-20 मध्ये आतापर्यंत एकूण 15 वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारताने पाकिस्तानला 12 वेळा पराभूत केले आहे, तर पाकिस्तान संघाला भारतीय संघाविरुद्ध तीन वेळा यश मिळाले आहे.





