Women’s ITF Precision Solapur Open : भारताच्या ऋतुजा भोसलेसह तीन खेळाडूंचा दुसऱ्या फेरीत प्रवेश…

सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन ( एसडीएलटीए ) यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए २५००० डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत ऋतुजा भोसले, मधुरिमा सावंत, सहजा यमलापल्ली, श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती या भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु झालेल्या या स्पर्धेत एकेरीत बेलारूसच्या विकी व्हॅन डी पीर हिने जपानच्या चौथ्या मानांकित अयानो शिमिझूचा ६-२, ६-२ असा सहज पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या मधुरिमा सावंतने सौम्या विगचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.
पाचव्या मानांकित ऋतुजा भोसले हिने श्राव्या शिवानी चिलकलापुडीचा ३-६, ६-४, ६-१ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून दुसरी फेरी गाठली. सातव्या मानांकित सहज यमलापल्लीने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या स्मृती भसीनचे आव्हान ६-२, ६-२ असे संपुष्टात आणले.
भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीने जपानच्या मिसाकी मत्सुदाला ६-२, ६-१ असे पराभूत केले. लात्वियाच्या सहाव्या मानांकित डायना मार्सिचेविकाने जपानच्या होनोका कोबायाशीचा ६-२, २-६, ६-४ असा पराभव करून आगेकूच केली.
Women’s ITF Precision Solapur Open : रशियाच्या मारिया तिमोफिवाला अव्वल मानांकन…
अव्वल मानांकित रशियाच्या मारिया तिमोफीवाने क्वालिफायर भारताच्या हुमेरा बहरामुसचा ६-४, ६-१ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. रशियाच्या डारिया कुडाशोवा हिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या डेन्मार्कच्या एलेना जमशिदीचा ६-१, ६-३ असा पराभव केला.





