सोलापूर – सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीएच्या सहकार्याने आयोजित केलेल्या एमएसएलटीए-एसडीएलटीए २५००० डॉलर महिला आयटीएफ प्रिसिजन सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत सोहा सादिक, हुमेरा बहारमुस, आकांक्षा नित्तूरे, श्राव्या चिलकलापुडी या भारतीय खेळाडूंनी मुख्य फेरीत प्रवेश केला.
सोलापूरच्या एमएसएलटीए टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु झालेल्या या स्पर्धेत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात भारताच्या आठव्या मानांकित सोहा सादिकने नेपाळच्या सोळाव्या मानांकित अभिलाशा बिस्तचा ६-१, ६-१ असा तर, अव्वल मानांकित हुमेरा बहारमुसने प्रत्युशा रचापिडीचा ६-१, ६-३ असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.
चुरशीच्या लढतीत आकांक्षा नित्तूरेने आरती मुनियनचा टायब्रेकमध्ये ६-२, ६-७ (४), १०-८ असा पराभव केला. चौथ्या मानांकित श्राव्या चिलकलापुडी हिने चौदाव्या मानांकित पूजा इंगळेवर ६-०, २-६, ११-९ असा विजय मिळवला.
Year Ender 2023 : रोहित शर्मासाठी 2023 वर्ष ठरले अनलकी! तीन वेळा हिटमॅन ठरला अपयशी…
मुख्य ड्रॉ मधील मानांकन यादी जाहीर करण्यात आली. जागतिक क्रमवारीत १३९ व्या स्थानी असलेल्या रशियाच्या मारिया तिमोफिवाला अव्वल मानांकन देण्यात आले. भारताच्या ऋतुजा भोसलेला पाचवे तर वैदेही चौधरीला सहावे मानांकन देण्यात आले आहे.