Women’s Asia Cup 2026 : पुन्हा रंगणार भारत-पाक महामुकाबला? सेमीफायनलच्या समीकरणाने वाढवली उत्सुकता
महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत रंगतदार वळण (Women's Asia Cup 2026) आले असून अंतिम फेरीतील एका बहुप्रतिक्षित महामुकाबल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Women’s Asia Cup 2026 : महिला आशिया कप २०२६ स्पर्धेत रंगतदार वळण (Women’s Asia Cup 2026) आले असून अंतिम फेरीतील एका बहुप्रतिक्षित महामुकाबल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय संघाविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानने जोरदार मुसंडी मारत हाँगकाँगचा धुव्वा उडवला आणि थेट उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. या विजयासह ‘अ’ गटातून भारतापाठोपाठ पाकिस्तान उपांत्य फेरी गाठणारा तिसरा संघ ठरला आहे.
दुसऱ्या बाजूला ‘ब’ गटात निर्विवाद वर्चस्व राखत श्रीलंकेने आपले तिन्ही सामने जिंकून (Women’s Asia Cup 2026) थाटात सेमीफायनल गाठली. आता उपांत्य फेरीतील चौथ्या जागेसाठी बांगलादेश आणि युएई यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने साखळी फेरीत सलग तीन विजय मिळवून सर्वात आधी उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले होते. गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर रंगणाऱ्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताचा सामना बांगलादेश विरुद्ध युएई लढतीतील विजेत्या संघाशी होईल. यानंतर दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगणार आहे.
महिला आशिया चषकाच्या इतिहासात टीम इंडियाचा एकहाती दबदबा राहिला असून भारताने ९ पैकी तब्बल ७ वेळा विजेतेपद पटकावले आहे. आता आठव्या विजेतेपदासाठी भारतीय संघ मैदानात उतरत असताना, पाकिस्तान मात्र पहिल्यावहिल्या चषकासाठी उत्सुक आहे.
पाकिस्तानसमोर सेमीफायनलमध्ये फॉर्मात असलेल्या श्रीलंकेचे तगडे आव्हान असणार आहे. जर पाकिस्तानने लंकन आव्हानावर मात केली आणि भारताने पहिला उपांत्य सामना खिशात घातला, तर महिला आशिया कपच्या (Women’s Asia Cup 2026) फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेतेपदासाठी थरारक महासंग्राम पाहायला मिळू शकतो.






