Pakistan Cricket Fixing : पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा फिक्सिंग? ‘या’ खेळाडूंचे मोबाईल जप्त; तर ७ खेळाडूंची तडकाफडकी हकालपट्टी
Pakistan Cricket Fixing : पाकिस्तान क्रिकेट संघातील वाद आता मॅच फिक्सिंगच्या संशयापर्यंत पोहोचला असून अंतर्गत चौकशी सुरु झाली आहे, ज्यामध्ये काही खेळाडूंच फोन जप्त करण्यात आले आहेत.

Pakistan Cricket Match Fixing Suspicions England Tour PCB Sacks Rizwan Imam Mobile Confiscated : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील वादाला आता भयंकर वळण लागले असून पुन्हा एकदा मॅच फिक्सिंगच्या संशयाचे भूत मानगुटीवर बसले आहे. हेडिंग्ले कसोटीत डावाने आणि लॉर्ड्सवर १९४ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर पीसीबीने अचानक ७ स्टार खेळाडूंना मायदेशी परत बोलावले. यात मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हक यांच्यासह आमिर जमाल, आगा सलमान, अवैस जफर, अली उस्मान आणि खुर्रम शहजाद यांचा समावेश आहे. याशिवाय मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांची थेट हकालपट्टी करण्यात आली.
केवळ खराब कामगिरी नाही, ‘क्रिकेटपलीकडचे’ कारण; मोबाईलमधील डेटा जप्त!
पाकिस्तानी न्यूज पोर्टल ‘जिओ न्यूज’ने केलेल्या दाव्यानुसार, ही मोठी कारवाई केवळ खेळाडूंच्या सुमार कामगिरीमुळे झालेली नाही, तर संशयास्पद हालचालींमुळे झाली आहे. लंडनमध्ये मुक्कामी असताना संशयावरून रिझवान आणि इमामचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आणि त्यातील डेटा ट्रान्सफर करून तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आला. तिसऱ्या बर्मिंगहॅम कसोटीसाठी सैम अयुब, साद बेग आणि अराफत मिन्हास यांच्यासह ७ नव्या खेळाडूंना तातडीने इंग्लंडला पाचारण करण्यात आले आहे.
पीसीबीला द्यावे लागले स्पष्टीकरण; अंतर्गत चौकशी सुरू!
🚨PAKISTANI PLAYERS INVOLVED IN MATCH FIXING🚨
Just when Pakistan cricket thought the match fixing ghosts were buried, they’re back to haunt PCB once again during the ongoing England Test series
7 top Pakistani players are involved in match fixing 😱 pic.twitter.com/5Ycc47Ir7w
— Richard Kettlebourogh Fans (@RichKettle07) September 7, 2026
The Pakistan Cricket Board has initiated an internal disciplinary inquiry following media reports concerning discipline and conduct, which are currently being reviewed internally. The PCB handles such matters in accordance with its standard procedures. The process is being…
— Amir Mir (@AmirMirpcb) September 7, 2026
या गंभीर आरोपांनी खळबळ उडाल्यानंतर पीसीबीचे मीडिया डायरेक्टर आमिर मीर यांनी स्पष्टीकरण जारी केले. त्यांनी सांगितले की, “खेळाडूंच्या शिस्तीबाबत समोर आलेल्या वृत्तांवरून बोर्डाने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. पीसीबी नियमांनुसार पुढील कारवाई करेल. मात्र, सोशल मीडियावर सुरू असलेल्या असत्यापित दाव्यांवर चाहत्यांनी विश्वास ठेवू नये.” परंतु, खेळाडूंचे फोन जप्त झाल्याच्या वृत्ताने संशय अधिक गडद झाला आहे.
२०१० च्या स्पॉट फिक्सिंगच्या काळ्या आठवणी ताज्या!
या संपूर्ण घडामोडींनी २०१० मधील लॉर्ड्स कसोटीतील कुख्यात स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्या काळ्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत. त्यावेळी सलमान बट्ट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर यांना फिक्सिंगप्रकरणी ब्रिटनमध्ये तुरुंगवास भोगावा लागला होता. आता पुन्हा एकदा इंग्लंडच्याच भूमीवर खेळाडूंचे फोन जप्त झाल्याने पाकिस्तान क्रिकेटवर संशयाचे काळे ढग दाटून आले आहेत.





