Women’s Asia Cup 2024 : टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात, पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव…

Women’s Asia Cup 2024 (India vs Pakistan ,Match Result) : – महिला आशियाई करंडक टी-20 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव करत विजयी सलामी दिली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 7 गडी राखून विजय मिळवला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान पाकिस्तानचा संघ 108 धावांवर गडगडला. प्रत्युत्तरात भारताने स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या दमदार खेळीच्या जोरावर विजयाची नोंद केली. भारताकडून गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने 3 बळी घेतले.
For her fine bowling display, Deepti Sharma bagged the Player of the Match award as #TeamIndia sealed a dominating win over Pakistan 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/30wNRZNiBJ#WomensAsiaCup2024 | #ACC | #INDvPAK | @Deepti_Sharma06 pic.twitter.com/7lvnSJNlFt
— BCCI Women (@BCCIWomen) July 19, 2024
पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 14.1 षटकांतच लक्ष्य गाठले. महिला आशियाई करंडक स्पर्धेत भारतीय महिलांचा हा पहिलाच सामना होता. आता युएई संघाविरुद्ध त्यांना दुसरा सामाना खेळायचा आहे. पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघासाठी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा सलामीला आल्या. यादरम्यान दोघींनी इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. मानधनाने 31 चेंडूंचा सामना करत 45 धावा केल्या. त्याच्या खेळीत 9 चौकारांचा समावेश होता. शेफालीने 29 चेंडूत 40 धावा केल्या. शफालीने 6 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्यानंतर दयालन हेमलता 14 धावा करून बाद झाली. तिने 11 चेंडूंचा सामना केला आणि 3 चौकार लगावले. सरतेशेवटी हरमनप्रीत कौर 5 धावा करून नाबाद राहिली आणि जेमिमा रॉड्रीग्स 3 धावा करून नाबाद राहिली.
तत्पूर्वी, टीम इंडियाने पाकिस्तानला 108 रन्सवर ऑलआउट केले. निदा दारच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाकडून अमीनने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्याने 35 चेंडूंचा सामना करत 3 चौकार मारत 22 धावांची खेळी केली. 16 चेंडूंचा सामना करताना त्याने नाबाद 22 धावा केल्या. सनाने एक चौकार आणि दोन षटकार मारले. हसनने 19 चेंडूंचा सामना करत 22 धावा केल्या. त्याने 3 चौकार मारले.
Women’s Asia Cup 2024 : दीप्ती-पूजा आणि रेणुकाचा अचूक मारा, पाकिस्तानचे भारतासमोर माफक लक्ष्य…
भारताची भेदक गोलंदाजी
पाकिस्तानच्या डावात भारतीय गोलंदाजांची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. दीप्ती शर्माने 4 षटकात 20 धावा देत 3 बळी घेतले. दीप्तीने 8 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पाकिस्तानचा कर्णधार निदाचा बळी घेतला. हसन 22 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर बाद झाली. भारताकडून रेणुका सिंग, श्रेयंका पाटील आणि पूजा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
दीप्तीचे एकाच षटकात 3 बळी
18व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दीप्तीने तुबाला बाद केले. येथे 22 धावांवर खेळत असलेल्या तुबाने पॉइंटवर शॉट खेळला. राधा यादवने अप्रतिम झेल घेतला. त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर फलंदाजीला आलेली सय्यदा अरुब शाहला राधा यादवने शानदार क्षेत्ररक्षण करत तिला धावबाद केले. त्यानंतर, पुढच्याच चेंडूवर नशारा सिंधूला दीप्तीने यष्टिरक्षक रिचा घोषच्या हाती झेलबाद केले. अशाप्रकारे दीप्तीने लागोपाठच्या चेंडूंवर तीन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तानः 19.2 षटकांत सर्वबाद 108 (सिद्रा अमिन 25, तुबा हुसेन 22, फतिमा साना नाबाद 22; दीप्ती शर्मा 3-20, श्रेयंका पाटील 2-14, पुजा वस्त्राकार 2-31, रेणुका सिंग 2-14) पराभूत वि. भारतः 14.1 षटकांत 3 बाद 109 (शफाली वर्मा 40-29 चेंडू, स्मृती मानधना 45-31 चेंडू; सईदा अरूफ शहा 2-9, नाश्रा संधू 1-20).





