Women’s Asia Cup 2024 : नेपाळने रचला इतिहास! यूएईचा 6 विकेट्सने पराभव करत स्पर्धेच्या इतिहासातील नोंदवला पहिला विजय…

Women’s Asia Cup 2024 (NEP vs UAE Match No. 1) :- श्रीलंकेच्या यजमानपदी शुक्रवारी महिला आशिया चषक 2024 ला सुरुवात झाली. अ गटातील पहिला सामना नेपाळ आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात झाला. या सामन्यात नेपाळने यूएईचा सहा गडी राखून पराभव करत इतिहास रचला. या स्पर्धेच्या इतिहासातील त्यांचा हा पहिलाच विजय आहे.
डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर युएईने 20 षटकात 8 विकेट गमावत 115 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेपाळने 16.1 षटकांत चार गडी गमावून 118 धावा करत सहज विजय मिळवला.
Nepal register their first-ever win in Women’s T20 Asia Cup with victory over UAE 👊
📝: https://t.co/fY0d0u8jmS | 📸: @ACCMedia1 pic.twitter.com/hEKiWcYkOg
— ICC (@ICC) July 19, 2024
महिला आशिया चषक स्पर्धेच्या इतिहासात नेपाळचा हा पहिला विजय आहे. गेल्या नऊ प्रयत्नांत त्याने विजयाची चव चाखली आहे. या सामन्यात समझना खड़काने चमकदार कामगिरी केली. तिने विरोधी संघाविरुद्ध 45 चेंडूंचा सामना केला आणि 72 धावांची नाबाद खेळी खेळली. तिच्याशिवाय नेपाळची वेगवान गोलंदाज इंदू वर्माने गोलंदाजी तीन बळी घेत यूएईला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
IND vs SL : टीम इंडियामध्ये ‘हा’ खेळाडू घेणार पांड्याची जागा? BCCIने आतापासून सुरू केली तयारी…
नेपाळच्या महिला फलंदाजाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केलेली ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यादरम्यान तिने 11 चौकार मारले. समझना खड़काने या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.





