Women’s Asia Cup 2024 : दीप्ती-पूजा आणि रेणुकाचा अचूक मारा, पाकिस्तानचे भारतासमोर माफक लक्ष्य…

Women’s Asia Cup 2024 (India vs Pakistan, Score Update) : महिला आशिया अंतर्गत भारत आणि पाकिस्तानचे संघ त्यांचा पहिला सामना खेळत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पाकिस्तान संघाने 19.2 षटकांत 10 गडी गमावून 108 धावा केल्या आहेत. आता भारताला विजयासाठी 109 धावांची आवश्यकता आहे.
🏏 Innings Break 🏏
A couple of fighting knocks from Tuba Hassan and Fatima Sana in the latter stage, as Pakistan are all out for 108 in 19.2 overs#PAKWvINDW | #WomensAsiaCup2024 | #BackOurGirls pic.twitter.com/jSNtVE4BwI
— Pakistan Cricket (@TheRealPCB) July 19, 2024
या सामन्यात पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. संघाला पहिला धक्का गुल फिरोजाच्या रूपाने बसला तिला केवळ पाच धावा करता आल्या. यानंतर मुनिबा अलीही 11 धावा करून बाद झाली. पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने सर्वाधिक 25 धावांची खेळी खेळली. तिने आपल्या खेळीत तीन चौकार मारले. मात्र, रेणुका सिंहने तिला राधा यादवकरवी झेलबाद केले.
याव्यतिरिक्त पाककडून फलंदाजीत आलिया रियाझने सहा धावा, निदा दारने आठ धावा, इरम जावेदने शून्य धावा, तुबा हसनने 22 धावा, सईदा अरुब शाहने दोन धावा, नशरा संधूने शून्य धावा, सादिया इक्बालने शून्य धावा आणि फातिमा सना हिने नाबाद 22 धावांची खेळी केली.
भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक तीन बळी घेतले. दीप्तीने 4 षटकात 20 धावा दिल्या. रेणुका सिंग, पूजा वस्त्राकार आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. राधा यादव हिला एकही यश मिळाले नाही. तिने 4 षटकात 26 धावा दिल्या.





