Women’s Asia Cup 2024 (Semi Final 1) : बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी अपेक्षित – शेफाली वर्मा

Women’s Asia Cup 2024 (Semi Final) : – आशियाई करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अजिंक्य भारतीय महिला संघाचा सामना बांगलादेशशी शुक्रवारी होणार आहे. हा सामना येथील मैदानार दुपारी २ वाजल्यापासून सुरु होईल. त्यापार्श्वभूमिवर या स्पर्धेत आत्तापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शेफाली वर्माने शुक्रवारी बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला खेळाच्या प्रत्येक विभागात सुधारणा करावी लागणार असल्याचे म्हटले आहे.
शेफालीने तीन सामन्यांत ५२ पेक्षा जास्त सरासरीने १५८ धावा केल्या आहेत. शेफाली म्हणाली, “आम्ही सर्व सामने जिंकत आहोत आणि एक संघ म्हणून चांगली कामगिरी करत आहोत ही चांगली भावना आहे. उपांत्य फेरी खूप महत्त्वाची आहे. आम्ही कठोर सराव करत आहोत. फलंदाजी अत्यंत चांगली होत असली तरी गोलंदाजही नेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. पण सतत सुधारणा करणे आवश्यक आहे. आम्ही क्षेत्ररक्षणासाठी मेहनत घेत आहोत,” असेही शेफालीने यावेळी म्हटले.
महिला आशिया चषक 2024 चा शेवटचा गट सामना बुधवारी खेळला गेला. श्रीलंकेने मलेशियाचा 10 गडी राखून पराभव केला. श्रीलंकेच्या या विजयासह स्पर्धेतील चारही उपांत्य फेरीतील खेळाडू निश्चित झाले आहेत. भारतीय महिला संघाने नेपाळचा 82 धावांनी पराभव केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान अ गटातून आधीच पात्र ठरले होते.
गतविजेत्याने अ गटात अव्वल स्थान पटकावले असून पहिल्या उपांत्य फेरीत त्यांचा सामना ब गटातील दुसऱ्या स्थानावरील बांगलादेशशी होईल. दरम्यान, दुसऱ्या उपांत्य फेरीत अ गटातील उपविजेत्या पाकिस्तानचा सामना ब गटातील अव्वल श्रीलंकेशी होईल.





