Paris Olympics 2024 (Archery) : पहिल्याच दिवशी भारताची दमदार कामगिरी, महिलांपाठोपाठ पुरुष संघानेही गाठली उपांत्यपूर्व फेरी…

Paris Olympics 2024 (Archery, Team India) : भारतीय तिरंदाज रँकिंग आणि पात्रता फेरीसाठी आज लेस इनव्हॅलाइड्स गार्डन्सवर उतरले होते. पॅरिस ऑलिम्पिकची अधिकृत सुरुवात 26 जुलैपासून होणार आहे, परंतु तिरंदाजीची पात्रता फेरी एक दिवस आधी सुरू झाली आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताच्या तिरंदाजी संघाने चमकदार कामगिरी केली आहे. महिला संघानंतर पुरुष संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
महिलांपाठोपाठ पुरुष संघही उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला. भारताच्या पुरूष संघाने तिसरे स्थान मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताच्या पुरूष संघाला एकूण 2013 गुण मिळाले. यामध्ये कोरिया अव्वल राहिला. त्यांना 2049 गुण मिळाले आहेत. तर फ्रान्स 2025 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर चीन, जपान आणि इटलीसह अनेक देशांना मागे टाकले.
The trio of Tarundeep Rai, Dhiraj Bommadevara and Pravin Jadhav have done a superb job by finishing in 3rd place, with a total score of 2013!
Off to the quarter finals scheduled for July 29!
Keep chanting #Cheer4Bharat and let’s cheer for our archers!#OlympicsOnJioCinema pic.twitter.com/VeU0FjjiCS
— SAI Media (@Media_SAI) July 25, 2024
या सामन्यात धीरज बोम्मादेवरा पुरुषांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर राहिला. त्याने 681 गुण मिळवले. याशिवाय तरुणदीप राय 674 गुणांसह 14व्या स्थानावर राहिला. तर, प्रवीण रमेश जाधव 658 गुणांसह 39व्या स्थानावर राहिला. यामध्ये कोरियाचा किम वूजिंग अव्वल राहिला.
तत्पूर्वी, पॅरिस ऑलिम्पिकच्या मानांकन फेरीत (Ranking Round) भारताच्या महिला तिरंदाजी संघाने चांगली कामगिरी केली आहे. दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि भजन कौर यांनी एकत्रितपणे भारताला 1,983 गुण मिळवून दिले आहेत. यासह भारतीय संघ चौथे स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे. यामध्ये कोरिया अव्वल राहिला. तर चीन दुसऱ्या स्थानावर राहिला. मेक्सिको तिसऱ्या स्थानावर आहे.
The Indian Women’s #Archery team comprising Bhajan Kaur, Deepika Kumari and Ankita Bhakat finish 4th in the team ranking round at #paris2024olympics.
Off to the quarterfinals tomorrow! 🏹
Many congratulations to them. Let’s #Cheer4Bharat👏🏻🥳 pic.twitter.com/afSeWP55EG
— SAI Media (@Media_SAI) July 25, 2024
वैयक्तिक गुणांबद्दल बोलायचे झाल्यास, भारतासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी अंकिता भगतने केली, तिने 72 शॉट्स मारून एकूण 666 गुण मिळवले आणि ती 11व्या स्थानावर राहिली. दुसरीकडे, दीपिका कुमारी आणि भजन कौर टॉप-20 मधून बाहेर राहिल्या. भारतीय खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीवर नजर टाकल्यास अंकिता 11व्या, भजन कौर 22व्या आणि दीपिका कुमारी 23व्या स्थानावर राहिली.
अंकिताने उत्तरार्धाच्या शेवटच्या दोन सेटमध्ये शानदार पुनरागमन केले, ज्यामध्ये तिने 120 पैकी 112 गुण मिळवले. शेवटच्या क्षणांमध्ये, विशेषतः 18 वर्षीय भजन कौरची अतिशय खराब कामगिरी दिसून आली, जिने एकूण 659 गुण जमा केले. दीपिका तिच्यापेक्षा एक गुण मागे होती आणि 658 गुणांसह मानांकन फेरी (Ranking Round) पूर्ण केली.





